दहशतवादी हल्ला आहे, बोलणं घाईचं- आबा पाटील

पुण्यात झालेल्या स्फोटांमागे दहशतवाद्यांचा हात आहे हे बोलणं घाईचं ठरेल असं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी म्हटलं. स्फोटानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी घटनास्थळाचा दौरा केला

Updated: Aug 2, 2012, 09:22 AM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यात झालेल्या स्फोटांमागे दहशतवाद्यांचा हात आहे हे बोलणं घाईचं ठरेल असं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी म्हटलं. स्फोटानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी घटनास्थळाचा दौरा केला.. यावेळी त्यांनी स्फोट झालेल्या चारही ठिकाणची पाहणी केली.. शिवाय पुण्यातल्या पोलीस अधिका-यांशी गृहमंत्र्य़ांनी चर्चा केली.. या स्फोटांचा सर्व बाजूंनी तपास सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

पुण्यात 4 ठिकाणी कमी तीव्रतेचे स्फोट झाले. जंगली महाराज रस्त्यावर ४ ठिकाणी हे स्फोट झालेत. बालगंधर्व, मॅकडोनाल्ड, देना बँक आणि गरवारे कॉलेजच्या परिसरात हे चार स्फोट झालेत. तर दोन ठिकाणची स्फोटकं निकामी करण्यात आलीयत. या ठिकाणांहून जवळच अण्णांच्या समर्थनार्थ होणा-या उपोषणाचा मंडप आहे... एक किलोमीटरच्या परिसरात आणि अवघ्या चाळीस मिनिटांमध्ये हे स्फोट झालेत.

 

स्फोटामध्ये डिटोनेटर, बॅटरी आणि पेन्सिल सेलचा वापर झाल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलीय. या स्फोटांनी पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. असं असलं तरी लोकांनी घाबरुन जाऊ नये, आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.