झी २४ तास वेब टीम, पुणे
निवडणूका आल्या कि पक्षांर्गत बडांळी होण्यास चांगलाच जोर येतो. भाजपला याचा दरवेळेस फटका बसतो. त्यामुळे पक्षात एकसंधता ठेवण्यासाठी आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार पुढे सरसावले आहेत. आधीच पक्षामध्ये मु़डें गट आणि गडकरी गट असल्याने पक्षाला याचा दरवेळेस त्रास होत असताना जिल्हा पातळीवर असे गटबाजीचे राजकारण होऊ नये.
यासाठीच मुनगंटीवार यांनी पक्ष एकसंध ठेवण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष एकसंध ठेवा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी पुण्यात केलं. शहर भाजपच्या नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते.
पुणे शहराध्यक्षपदी गडकरी गटाच्या विकास मठकरी यांची निवड झाल्यापासून पुणे भाजपमध्ये वाद सुरू झाले. आणि त्यानंतर पक्षातली गटबाजी वेळोवेळी समोर आली. अशा परिस्थितीत एकोपा बाळगण्याचं आवाहन मुनगंटीवारांनी केलं. दरम्यान आजच्या कार्यक्रमाला मात्र सर्व गटांचे कार्यकर्ते उपस्थित होते.