पिंपरी-चिंचवडकरांवरही पाणीकपातीचे संकट

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडवरही पाणीकपातीची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे ही पाणीटंचाई जाणीवपूर्वक केल्याचा आरोप होतोय. निवडणुका संपताच राजकारण्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केलीय.

Updated: Mar 1, 2012, 08:55 PM IST

www.24taas.com, पिंपरी -चिंचवड

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडवरही पाणीकपातीची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे ही पाणीटंचाई जाणीवपूर्वक केल्याचा आरोप होतोय. निवडणुका संपताच राजकारण्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केलीय.

पुण्यापाठोपाठ आता पिंपरीमध्येही पाणी कपात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तरीही जाणीवपूर्वक ही पाण्याची समस्या निर्माण केल्याचा आरोप होतोय. टँकर माफियांसाठी हा पाण्याचा कृत्रिम तुटवडा करण्यात आल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर पवना धरणातून बंद पाईपलाईला विरोध करण्यासाठी मावळच्या शेतक-यांचं आंदोलन पेटलं होतं. तीच योजना सुरू करण्यासाठी सत्ताधा-यांचे हे कारस्थान असल्याचंही बोललं जातंय.

शहरातल्या पाणी समस्येबद्दल सध्या तरी सत्ताधारी आणि प्रशासन बोलायला तयार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीच्या जाहीरनाम्यात 24 तास पाणीपुरवठ्याचं आश्वासन दिलं होतं. निवडणूक संपताच दोन आठवड्यातच हे आश्वासन हवेत विरलंय.