बलात्कारी मोहनीराजला होणार का शिक्षा?

२००९ मध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणात पुण्यातील मोहनीराज कुलकर्णी या ८१ वर्षाच्या आरोपीला पूणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवल आहे. मोहनीराजला या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाणार आहे.

Updated: Jan 3, 2012, 07:01 PM IST

www.24taas.com, पुणे

 

२००९ मध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणात पुण्यातील मोहनीराज कुलकर्णी या ८१ वर्षाच्या आरोपीला पूणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवल आहे. मोहनीराजला या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाणार आहे. १४ ऑक्टोबर २००९ रोजी ही घटना घडली होती. पुण्याच्या नारायणपेठेतील यशोदिप बंगल्यावर रेखा रणदिवे हिच्या दहा वर्षाच्या मुलीचा म्हणजेच रोहिणी रणदिवेचा मृतदेह संशयास्पदरित्या  आढळला होता.

 

या प्रकरणी मोहनीराजला विश्रामबाग पोलिसानी अटक केली होती. मोहनीराज हा हिदुंस्थान ऍण्टीबायोटिक्स मधील निवृत्त केमीकल इंजीनीअर आहे. याप्रकरणी रेखा हिला देखिल सहआरोपी करण्यात आलं होत. रेखा आणि मोहनीराजचे अनैतिक संबध होते. या संबधातून त्या मुलीवर बलात्कार करुन खुन करण्यात आला होता. या घटनेनंतर रेखाने पैशाच्या आमिषातून मोहनीराज विरोधातली पुरावा नष्ट करण्यास मदत केली होती.

 

मात्र या प्रकरणात रेखा हिनेच माफीचा साक्षादार बनत, या खटल्याला नव वळण दिलं होत. मोहनीराजला कठोर शिक्षा व्हावी अशी पुणेकरांची मागणी होती, या साऱ्या पार्श्वभुमीवर आता मोहनीराजला काय शिक्षा होते याकडे साऱ्यांच लक्ष लागलं आहे.