ब्लॉक अध्यक्षांना आमदार निम्हण यांची धमकी

खासदार सुरेश कलमाडी यांच्या पुणे महापालिकेतील प्रवेशाने सुरु झालेल्या काँग्रेस पक्षातील संघर्षानं आता नवे वळण घेतले आहे. या वादात कलमाडींची बाजू घेणाऱ्या काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांना आमदार विनायक निम्हण यांनी धमक्या दिल्याचे पुढे आले आहे.

Updated: Jun 13, 2012, 07:59 PM IST

www.24taa.com, पुणे

खासदार सुरेश कलमाडी यांच्या पुणे महापालिकेतील प्रवेशाने सुरु झालेल्या काँग्रेस पक्षातील संघर्षानं आता नवे वळण घेतले आहे. या वादात कलमाडींची बाजू घेणाऱ्या काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांना आमदार विनायक निम्हण यांनी धमक्या दिल्याचे पुढे आले आहे.

या ब्लॉक अध्यक्षांना हात-पाय तोडेल आणि घरी येऊन मारहाण करेल. अशी धमकी आमदार निम्हण यांनी फोनवरून दिल्याची तक्रार या ब्लॉक अध्यक्षांनी केली आहे. खासदार कलमाडी सोमवारी पुणे महापालिकेत आले होते. त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावर टीका करत निम्हण यांनी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

निम्हण यांच्या या टीकेला उत्तर म्हणून कॉंग्रेसच्या आठ ब्लॉक अध्यक्षांनी मंगळवारी एक पत्र प्रसिधीसिद्स दिले. कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची संस्कृती काय आहे हे निम्हण यांनी आधी शिकून घ्यावे. आणि नंतर राजीनाम्याची मागणी करावी. असे प्रत्युतर निम्हण यांना या पत्रातून देण्यात आले होते.

या पत्रावर सह्या असलेल्या ब्लॉक अध्यक्षांना निम्हण सकाळपासून फोने करत आहे. आणि फोनवरून धमक्या देत असल्याची तक्रार ब्लॉक अध्यक्षांनी केली आहे. या संधर्भात प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती या ब्लॉक अध्यक्षांनी दिली आहे.