युवा शेतकऱ्याचा शोध ज्वारी पॉलीश मशीन

वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील ज्वारीची प्रत घसरते यावर उपाय म्हणून सातारा जिल्ह्यातील अमरजीत सावंत या युवा शेतकऱ्यानं ज्वारीची पॉलीश मशीन तयार केलीय. अशा प्रकारचं राज्यातील हे पहिलं मशीन असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय.

Updated: Nov 22, 2011, 02:06 PM IST

झी २४ तास वेब टीम, सातारा

 

वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील ज्वारीची प्रत घसरते यावर  उपाय म्हणून सातारा जिल्ह्यातील अमरजीत सावंत या युवा शेतकऱ्यानं ज्वारीची पॉलीश मशीन तयार केलीय. अशा प्रकारचं राज्यातील हे पहिलं मशीन असून  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय. प्रतवारीवरुन ज्वारीचा बाजारपेठेत दर ठरत असतो अनेकवेळा जानेवारी महिन्यात दाणे भरताना सकाळी सापेक्ष आर्द्रता ८० टक्क्यांवर आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० टक्क्यांवर आणि दररोज धुके पडणाऱ्या भागात जवारीची कणसातील दाण्यावर 'ब्लॅकमोल्ड' म्हणजेच बोंडं काळी पडतात तसंच अवकाळी पाउस,करण्यामुळेसुद्धा  ज्वारीची बोंडं काळवंडतात. अशी ज्वारीला बाजारात केवळ १२०० ते १३०० रुपये दराने विक्री होते. मात्र हीच ज्वारी पॉलीश करुन खराब बोंडे बाजूला काढण्यासाठी कराड तालुक्यातील काळंबवाडी गावातील अमरजीत सावंत या युवा शेतकऱ्यानं ज्वारीचं पॉलीश मशिन तयार केलं.

 

या मशिनमुळे तासाला १०पोती पॉलीश होतात. एका पोत्यासाठी ३५ रुपये प्रमाणे महिन्यात २००० पोती पॉलीश होत असल्यानं हंगामात महिन्याकाठी ७० हजार रुपयांचं उत्पन्न अमरजीतला मिळतंय. या यंत्रामुळे शेतक-यांनाही क्विंटलला ८०० ते १००० रुपयांचा वाढीव दर मिळाल्यानं अमरजीतची कल्पकता यशस्वी ठरलीय.

 

अमरजीतला या यंत्रासाठी दिड लाख रुपयांचा खर्च आला आहे त्याची ही कल्पकता वापरुन  सातारा जिल्ह्यातील आणखी ४ मशीन कराड तालुक्यात तयार झाले आहेत. एका हंगामात गुंतवणूक केलेली रक्कमेची परतफेड होउन पॉलीश मशिन व्यवसायिकांना अमरजीतमुळे दुप्पटीने पैसे मिळतायत.