सोलापूर पालिकेत कोटीच्या कोटी उड्डाणे

सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. महापालिकेतल्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या एका रस्ते ठेकेदारानं आपल्याला एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते सुरेश पाटील यांनी केला

Updated: Dec 6, 2011, 03:27 PM IST

झी २४ तास वेब टीम, सोलापूर 

 

सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. महापालिकेतल्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या एका रस्ते ठेकेदारानं आपल्याला एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते सुरेश पाटील यांनी केला. तर काँग्रेसनं हा आरोप फेटाळला असून दोन्ही बाजूंकडून चौकशीची मागणी होते आहे

 

सोलापुरातील रस्ते आणि ड्रेनेजच्या ठेक्याचं काम करणाऱ्या ठेकेदारानं  एक कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर केल्याचा आरोप महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांनी केला. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सोलापूर मनपाला साडेपाचशे कोटींचा निधी मिळाला. हा निधी येत्या तीन वर्षात खर्च करायचा आहे. असं असताना निवडणुकीच्या तोंडावर ही कामं पूर्ण करण्याचा महापौर आणि सत्ताधारी काँग्रेसचा हट्टहास असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

 

विकासनिधी मिळूनही केवळ राजकारण्यांच्या या चिखलफेकीत विकासकामं खोळंबून राहत आहेत. त्यामुळे हे वाद लवकरात लवकर संपून कामं मार्गी लागावीत अशी साधी अपेक्षा सोलापुरकर व्यक्त करत आहेत.