झी २४ तास वेब टीम, मुंबई
शरद पवार हल्ल्यानंतर मुंबईत परतले. अण्णांच्या मुद्दावर अधिक भाष्य करण्यास पवारांनी नकार दिला. अन्नधान्याचे उत्पादन वाढले पाहिजे. शेतकऱ्यांना खर्चाची किंमत दिली पाहिजे. घटनात्मक संस्थांवरील हल्ले घातक. असे होणे म्हणजे अराजकाकडे वाटचाल असं पवार म्हणाले.
संसदेतील गोंधळावर पवारांनी नाराजी व्यक्त केली. ‘राईट टू रिकॉल’ कायदा देशाला परवडणारा नाही. कापसाबाबतचा निर्णय निवडुकांनंतर घेऊ. एकजूट दाखविल्याब्द्दल महाराष्ट्रातील नेत्यांचे आभार. लोकप्रतिनिधींना आत्मचिंतनाची गरज असल्याचे प्रतिपादनही पवारांनी पत्रकार परिषदेत केलं.