www.24taas.com, नागपूर
नागपूरच्या काटोल भागात उल्कापात झाल्याच्या बातमीला आता जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं दुजोरा दिला आहे. त्यामुळे विमान पडलं किंवा अशाच इतर बातम्या अफवा असल्याचं आता स्पष्ट झालंय.
काटोलमध्ये मोठा आवाज झाल्यानंतर संपूर्ण परिसरातच घबराटीचं वातावरण पसरलं होतं. पहिल्यांदा कुणालाच काही न समजल्यानं अर्थातच या घटनेबाबत लगेचच अनेक अफवांना पेव फुटलं. याबाबत काही स्थानिकांनी पोलिसांना याघटनेबाबतची माहिती दिली. हा मोठा आवाज एक मोठा आगीचा गोळा पडल्यामुळे आला होता. पण पोलिसांनी मात्र या माहितीवर विश्वास ठेवला नाही. शेवटी जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या पथकानं काटोल विभागाला पाचरण करण्यात आलं. त्यानंतर या पथकानं इथं उल्कापात झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला.