येत्या वर्षभरात केंद्राकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना राबविण्याकरता राज्याला २००० कोटी रुपये मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. नागपूर इथे एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही कबूली दिली की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्र कमी निधी मिळवू शकला. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशने साधारणता पाच हजार कोटी रुपयांचा निधी या योजनेखाली केंद्र सरकारकडून मिळविला. पण आता राज्य सरकारने कृती गट स्थापन केला असून येत्या वर्षी महाराष्ट्रही केंद्राक़डून निधी मिळवण्यात मागे राहणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकारची रोजगार हमी योजना असून त्याकडे अधिकारी वर्ग अधिक लक्ष देत होता. पण आता राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृती गटाने केंद्र सरकारची योजना राबविण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं