झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी
शरद पवार यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर अण्णा हजारे यांनी केलेलं वक्तव्य यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. आता यात भर म्हणजे या हल्ल्याचे समर्थन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शरद पवारांवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केलं.
ब्लॉगमधून अण्णांनी शरद पवारांवर कठोर शब्दात टीका केली. समाजहितासाठी हिंसा गैर नसल्याचंही त्यांनी म्हटलं. तरुणाने पवारांवर हल्ला का केला, याचा विचार व्हायला हवा, असंही अण्णांनी म्हटलं. पवारांवर झालेल्या हल्ल्यानंतर दिलेल्या वादग्रस्त प्रतिक्रियेचंही त्यांनी समर्थन केलं. कठोर शब्द वापरणे ही हिंसा आहे, मात्र समाजहितासाठी हिंसा गैर नसल्याचं अण्णांनी म्हटलं. गांधीवादी अण्णांच्या या नव्या तत्वज्ञानानं खळबळ उडाली.