www.24taas.com, सॅन फ्रान्सिसको
ऍपल पुढच्या महिन्यात आयपॅड 3 बाजारात लँच करण्याची शक्यता आहे. नेक्स्ट जनरेशन आयपॅडमध्ये अधिक वेगवान चिप्स आणि चांगले ग्राफिक्स या फिचर्सचा समावेश असेल असं टेक्नोलॉजी न्युज साईट ऑलथिंग्जडीने म्हटलं आहे. पण बाजारपेठेत नेमकं कधी उपलब्ध होईल याविषयी काहिही तपशील दिलेला नाही. नव्या टॅबलेटचं नामकरण आयपॅड 3 असण्याची शक्यता अधिक आहे त्यात रेटिना डिसप्लेचा समावेश असेल.
आयफोन 4 आणि आयफोन 4S मध्ये रेटिना डिसप्ले फिचर्सचा समावेश आहे. मानवी डोळे फक्त ३०० पिक्सेल्स प्रति इंच प्रतिमा पाहु शकतात त्यामुळेच स्मार्टफोन्सच्या स्क्रीनवर प्रतिमा ३२६ पिक्सेल्स प्रति इंच उपलब्ध करुन दिल्या जातात. त्यामुळेच टेक्स्ट आणि प्रतिमा उच्च दर्जाच्या प्रिंटेड व्हर्जनप्रमाणे दिसतात. आयपॅड 2 प्रमाणेच लँच नंतर खरेदीसाठी एक आठवड्याच्या कालावधीत आयपॅड 3 विकत घेता येईल असा अंदाज आहे. ऍपलने लँच नेमकं कधी करण्यात येईल यासंबंधी कोणताही तपशील देण्यास नकार दिला.