www.24taas.com, जिनेव्हा
देव भेटलाय...हा दावा आमचा नाही तर त्या शास्त्रज्ञांचा आहे ज्यांनी गॉड पार्टीकलचा शोध लावलाय. स्वित्झर्लंडमध्ये शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाच्या रहस्याचा खुलासा केला. गॉड पार्टीकल याचा अर्थ एक असा मूल कण ज्यापासून या विश्वाची उत्पत्ती झाली.
शास्त्रज्ञांनी या मुलकणाचा शोध घेण्यासाठी 27 किमी लांबीच्या बोगद्यात प्रोटॉनची टक्कर घडवली. प्रत्येक पदार्थात असलेल्या उर्जेमुळे विश्वाचं संचलन चालतं हे विज्ञान आधीपासूनच सांगत आलंय. मात्र ही ऊर्जा कोणत्या अवस्थेत त्या पदार्थाला मिळते हे शास्त्रज्ञांना अद्याप स्पष्ट करता आलेलं नव्हतं. प्रत्येक पदार्थ अणु-रेणु आणि परमाणुपासून बनलेला असतो. मात्र या तिघांची निर्मिती कशापासून होते हे जाणण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून करत होते. याचं उत्तर तेव्हाच मिळालं जेंव्हा शास्त्रज्ञांनी प्रोटान तोडण्यासाठी स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या जमीनीवर 27 किमी.लांबीचा खड्डा खोदण्यात आला. त्यात दोन विरूद्ध दिशांनी प्रोटोन्सचे बीम सोडण्यात आले. त्यानंतर चुंबकीय प्रभाव निर्माण करण्यात आला. त्यामुळे प्रोटॉन्समध्ये टक्कर झाली. त्यातून मोठी उर्जा निर्माण होऊन डार्क मेटर अस्तित्वात आलं.
हा डार्क मॅटर तोच असावा ज्याची विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी झालेल्या महाविस्फोटात निर्मीती झाली असावी असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. त्यांनी प्रोटॉनच्या विघटनानंतर बनलेल्या कणांना हिग्स बोसान कण असं नाव दिलय. त्यालाच गॉड पार्टीकल किंवा ईश्वराचा अंश असं म्हंटलं जातं.