www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली हायकोर्टानं फेसबूक तसच गुगल सर्च इंजिन या सोशल नेटवर्किंग साईट्स ब्लॉक करण्याचा इशारा दिला आहे.
आक्षेपार्ह गोष्टींना आळा घालणारी यंत्रणा या साईट्मार्फत उभारण्यात आली नाही तर चीनप्रमाणे फेसबूक आणि गुगल सर्च इंजिन ब्लॉक करण्यात येईल असं हायकोर्टानं म्हटलं आहे. कोट्यवधी लोक या साईट्सचा वापर करतात. विशेषता फेसबूकची लोकप्रियता गेल्या काही दिवसांत खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
मात्र या साईट्चा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. कोणताही आक्षेपार्ह मजकूर अथवा छायाचित्र काढून टाकण्याची यंत्रणा या साईट्वर नाही त्यामुळे हायकोर्टानं हे प्रकरण गांभीर्यानं घेत कारवाईचा इशारा दिला आहे.