'विंडोज ८'चं 'बीटा' व्हर्जन 'फ्री'

प्रथमच मायक्रोसॉफ्ट आपल्या आगामी ‘विंडोज ८’चं व्हर्जन लाँच करण्यापूर्वीच ग्राहकांच्या हातात टेस्टींगसाठी देणार आहे. ‘विंडोज ८’ ही नवी ऑपरटिंग सिस्टम टॅब्लेट पीसी सारख्या न्यू वेव्ह काँप्युटर तसंच पारंपरिक डेस्कटॉप काँप्युटरसाठीही वापरण्यात येऊ शकते.

Updated: Mar 1, 2012, 10:59 AM IST

www.24taas.com, बार्सेलोना

प्रथमच मायक्रोसॉफ्ट आपल्या आगामी ‘विंडोज ८’चं व्हर्जन लाँच करण्यापूर्वीच ग्राहकांच्या हातात टेस्टींगसाठी देणार आहे. ‘विंडोज ८’ ही नवी ऑपरटिंग सिस्टम टॅब्लेट पीसी सारख्या न्यू वेव्ह काँप्युटर तसंच पारंपरिक डेस्कटॉप काँप्युटरसाठीही वापरण्यात येऊ शकते.

या विंडोज ८चं ‘बीटा’ व्हर्जन बार्सेलोना येथील मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लोकांसमोर सादर करण्यात आलं. मोबाइल वर्ल्ड काँग्रेस हे जगातली सर्वांत मोठे सेल फोन विक्री प्रदर्शन आहे. ‘मायक्रोसॉफ्ट कॉर्प’ने ‘विंडोज ८’ हे फ्री डोऊनलोड करण्यास परवानगी दिली आहे. या ऑपरेटिंग सिस्टमसोबतच नव्या ‘विंडोज स्टोअर’मधून फ्री अॅप्लिकेशन्सही डाऊनलोड करता येतील.

विंडोज ८ मध्ये नेहमीसारखा ‘स्टार्ट’ मेनू आणि अॅप्लिकेशन्स नसतील. त्याऐवजी ‘मोझाइक टाईल्स’प्रमाणे स्क्रीनवर डिझाइन पसरले असेल. या टाईल्स रस्त्यावरील बोर्डाप्रमाणे दिसतील. यांच्यावर की- बोर्ड आणि  माऊसने क्लिक करून किंवा केवळ स्पर्शाने नेव्हिगेट करणं शक्य होणार आहे. मायक्रोसॉफ्टने या डिझाइनला ‘मेट्रो’ असं नाव दिलं आहे.