www.24taas.com, वॉशिंग्टन
'अॅप्पल' या सॉफ्टवेअर कंपनीच्या आयपॅडला आत्तापर्यंत तोड नव्हती. पण, आता टॅबलेटच्या क्षेत्रात घुसून बाजी मारण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा ‘सुपर’ सज्ज झालाय. मंगळवारी लॉस एंजलिसमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीनं 10.6 इंचाचा एक टॅबलेट लॉन्च केलाय. या टॅबलेटचं नाव आहे, ‘सरफेस’...
‘सरफेस’ हा एआरएम प्रोसेसरवर चालणारा आणि विंडोज आरटीला सपोर्ट करणारा टॅबलेट आहे. 10.6 इंचाच्या या टॅबलेचची जाडी 9.3मिलीमीटर एवढी आहे. अॅप्पलच्या सगळ्यात जास्त किंमतीच्या टॅबलटची जाडी यापेक्षा जास्त आहे. सरफेसचं वजन आहे फक्त 676 ग्रॅम आणि याच्या एआरएम प्रोसेसरवर एमएस ऑफिस 15 चालू शकतो. यूएसबी 2 ला सरफेस सपोर्ट करतो. हा टॅबलेट लोकांच्या नक्कीच पसंतीस पडेल आणि बाकीच्या कंपन्यांना मागे टाकील, असा विश्वास मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी स्टीव्ह बाल्मर यांनी विश्वास व्यक्त केला. या टॅबलेटचं कीपॅड आणि मल्टीटच ट्रॅकपॅड सोप्या पद्धतीनं हाताळता येऊ शकतं, असं कंपनीचं म्हणणं आहे.
टायपिंगसाठी सरफेसमध्ये दोन पेन दिले जातील. ज्यावेळी हे पेन वापरले जात असतील त्यावेळी सरफेसच्या स्क्रीनवर टच इनपूट काम करणं बंद करेल. त्यामुळेच जर चुकून तुमचं बोट सरफेसच्या स्क्रीनवर पडलं तरी त्याचा परिणाम मात्र जाणवणार नाही. टॅबलेटची किंमत मात्र कंपनीनं गुलदस्त्यातच ठेवलीय.
.