www.24taas.com, नवी दिल्ली
मुलीचं लग्नाचं वय हे कायदेने १८ वर्ष पूर्ण इतकं असतं. मात्र आता जर १८ वर्षाचा मुलीसोबत लग्न केले तरी, तिची वयाची २० वर्ष पूर्ण होईपर्यंत तिचाशी शारीरिक संबंध करता येणार नसल्याचे कोर्टाने एका प्रकरणात निकाल दिला आहे. अल्पवयीन मुलगी २० वर्षांची होईपर्यंत लग्न मोडूदेखील शकते. तिला तसा कायद्याने अधिकार आहे. त्यामुळे पती अल्पवयीन पत्नीचा ताबा मिळवू शकतो, मात्र ती २० वर्षांची होत नाही तोपर्यंत शारीरिक संबंध ठेवू शकणार नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
एखादी अल्पवयीन मुलगी समजदार वयात आल्यानंतर आपल्या माता-पित्याच्या ताब्यातून बाहेर निघू शकते का, अशी विचारणा त्यात करण्यात आली होती. २० वर्ष पूर्ण होईपर्यंत शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी मिळू शकत नाही. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार अल्पवयीन मुलीचे लग्न योग्य नाही. कारण ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्यासाठी तयार नसते.
त्यामुळे अशा प्रकारचा विवाह रद्द करणेच योग्य आहे, असे न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. के. शाली यांच्या खंडपीठाने सांगितले. त्यामुळे अशा प्रकारचा विवाह रद्द करणेच योग्य आहे.