बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सध्ये स्टे फ्री-DNA मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. देशातली ही पहिली महिला मॅरेथॉन स्पर्धा आहे. मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण तसंच झी एन्टटेन्मेंट लिमिटेडचे संचालक पुनीत गोयंका यांची खास उपस्थिती होती.
हाफ मॅरेथॉनसह 10 किलोमीटर आणि फन मॅरेथॉन अशा तीन प्रकारांमध्ये ही मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. महिलांना एक नवा आत्मविश्वास आणि उत्साह देण्याच्या हेतुने आयोजित केलेल्या या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देशातील पहिल्या वहिल्या महिला मॅरेथॉनचं आयोजन मुंबईत करण्यात आलं.. तब्बल 3 हजार महिलांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. 21 किलोमीटर लांबीच्या या मॅरेथॉनला प्लॅग ऑफ दिला तो झी ग्रुपचे एम डी पुनित गोयंका आणि बॉलीवूड एक्ट्रेस दीपिका पदूकोन यांनी...सर्वायकल कँन्सर आणि महिलांशी संबंधित विविध मुद्यांवर जनजागृतीच्या उद्देशाने या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं...
रविवारची सकाळ ही मुंबईच्या महिलांसाठी काही खास होती..बीकेसी भागात पहिल्या महिला मॅरेथॉनच आयोजन करण्यात आलं... या हाफ मॅरेथॉनमध्ये 12 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांनी सहभाग घेतला होता.. या विशेष मॅरेथॉनच्या आयोजनाचा उद्देश महिलांमध्ये शिक्षा, कँन्सर आणि सार्वजनिक आरोग्य अशा व्यापक विषयांवर जागृती घडवून आणण्याचा होता...झी ग्रुपचे एम डी पुनित गोयंका आणि बॉलीवूड एक्ट्रेस दीपिका पदूकोन यांनी या मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ दिला...
हाफ मॅरेथॉनचं अंतर 21 किलोमीटर, स्पिरिट मॅरेथॉनचं 10 किलोमीटर तर फन मॅरेथॉनचं अंतर 5 किलोमीटर ठेवण्यात आलं होतं... तिनही मॅरेथॉनमध्ये तब्बल 3 हजार महिलांनी सहभाग घेतला..महिलांशी संबंधित विविध मुद्यांवर त्यांनी संदेश दिला..या विशेष मॅरेथॉनमध्ये सामान्य महिलांबरोबरच तारा शर्मा, पायल रोहतगी यांसरख्या सेलिब्रेटीनींही मोठ्या उत्साहात भाग घेतला...
हाफ मॅरेथॉनची विजेता ठरली ती मुंबईचीच मोनिका अत्रे..तिनं 1 तास 13 मिनटांत हे 21 किलोमीटरचं अंतर पार केलं.. ललिता बब्बर फर्स्ट रनरअप तर सुप्रिया पाटील सेकण्ड रनरअप ठरली...