www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय टेनिस स्टार महेश भूपतीनंतर आता रोहन बोपन्ना यानेही लंडन ऑलिंपिकमध्ये लिएंडर पेस सोबत खेळण्यास नकार दिला आहे. या संदर्भात त्याने अखिल भारतीय टेनिस संघाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे.
बोपन्नाने एक इमेल पाठवून आपण पेस सोबत खेळणार नसल्याचे कळविल असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी महेश भूपतीनेही अशा प्रकारे पत्र पाठवून पेससोबत न खेळण्याचे एआयटीएला कळविले होते.
यापूर्वी पेसचे लंडन ऑलिंपिकच तिकीट पक्क झालं आहे. परंतु, महेश भूपती यांने घेतलेल्या भूमिकेमुळे त्याचा लंडन ऑलिंम्पिकचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. पेसने मला धोका दिला असा आरोप भूपतीने सार्वजनिक स्तरावर केला आहे. दरम्यान, एआयटीएने पेस-भूपती जोडीला लंडन पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु खेळाडू आपल्या मतावर अडून बसले आहेत तर एआयटीएही आपल्या भूमिकेवर अडून बसली आहे.