www.24taas.com, युक्रेन
‘डिफेन्डिंग चॅम्पियन्स’ स्पेन आणि टुर्नामेंटमधील ‘डार्क हॉर्स’ इटली यांच्यामध्ये युरो कपची फायनल रंगणार आहे. विजयासाठी फेव्हरिट असलेल्या स्पॅनिश टीमला इटलीच्या कडव्या आव्हानाला सामोर जाव लागणार आहे. जर्मनीला पराभवाचा धक्का देत इटलीनं फायनल गाठली होती. त्यामुळे कॅसियसच्या टीमला त्यांच्यापासून सावध रहावं लागणार आहे.
स्टार पॉवरची मांदियाळी असलेली स्पॅनिश टीम आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी घेरलेली इटलीची टीम युरो कपच्या फायनलमध्ये आमने-सामने येणार आहेत. युरो कपमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीनं फायनल गाठणारी स्पॅनिश टीम टुर्नांमेंटमध्ये अनपेक्षितरित्या भरारी घेणारी इटालियन टीम ‘हाय व्होल्टेज’ मॅचसाठी आतूर आहे. या मॅचमध्ये स्पेनचं पारडं जरी जड असलं तरी, इटलीला त्यांना कमी लेखून चालणार नाही. या दोघांमधील सुपर फाईट फुटबॉलप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
आंद्रेय पिर्लो आणि झावी ओलोन्सो यांच्यामध्ये अनोखी लढत फुटबॉलप्रेमींना पाहाता येणार आहे. तर २०१० वर्ल्ड कपचा हिरो आंद्रेस इनियस्ता आणि डॅनियल दि रॉस यांच्यामध्ये बिग फाईट रंगेल. मारियो बालोटेलीसमोर सर्गियो रामोसला रोखण्याचं आव्हान असणार आहे.
इटलीला फायनलमध्ये प्रवेश निश्चित करून देण्यात मारियो बालोटेलीनं महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे फायनलमध्ये त्याच्यावरच ‘मेन इन ब्लू’ची मदार असणार आहे. तर स्पॅनिश टीम संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जवळपास कुठल्याही स्ट्रायकरविना खेळली. आता त्यांची हीच रणनिती यशस्वी ठरते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता मोठ्या टुर्नामेंटचा अनुभव गाठिशी असलेली स्पॅनिश टीम बाजी मारते की, टुर्नामेंटमध्ये सरप्राईज पॅकेज ठरलेली इटलीची टीम सरस ठरते, याकडेच फुटबॉलप्रेमींच लक्ष असणार आहे.
.