टीम इंडिया काहीचं करू शकत नाही...

सिडनी वन-डेत भारतीय बॅट्समनने साफ निराशा केली आहे. भारताला जिंकण्यासाठी २५३ धावाचं आव्हान आहे. त्यामुळे हे आव्हान घेऊन टीम इंडियाचे बॅट्समन बॅटींगसाठी आले खरे. पण फक्त हजेरी लावण्याचं काम केलं.

Updated: Feb 27, 2012, 04:09 PM IST

www.24taas.com, सिडनी

 

सिडनी वन-डेत भारतीय बॅट्समनने साफ निराशा केली आहे. भारताला जिंकण्यासाठी २५३ धावाचं आव्हान आहे. त्यामुळे हे आव्हान घेऊन टीम इंडियाचे बॅट्समन बॅटींगसाठी आले खरे. पण फक्त हजेरी लावण्याचं काम केलं. दिग्गज खेळाडू अपयशी ठरत आहेतच. पण ज्या यंगस्टर्सचा उदोउदो केला जात होता त्यांनी सुद्धा पाट्या टाकण्याचेच काम केले.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

भारताच्या १०० रन्सचा आतच ५ विकेट गेल्या होत्या. म्हणजे जवळ जवळ निम्मा संघ तंबूत बसून दुसरा कसा बॅटींग करतो आहे याचे निरीक्षण करत आहेत. गंभीर आणि कोहली यांनी २० धावांपर्यंत मजल मारली. तर सतत फ्लॉप ठरणार रैना याने त्यांचा फ्लॉप परफॉर्मेन्स पुढे चालूच ठेवला आहे. भारताला जिंकण्यासाठी २४ ओव्हरमध्ये आणखी १५० रनची गरज आहे. आता धोनी आणि आश्विन खेळत आहे.

 

सिडनी वन-डे मध्ये ज्याप्रमाणे ऑसींची सुरवात खराब झाली होती. तशीच भारताची देखील झाली आहे. भारतीय ओपनर पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरले आहेत. सेहवाग हा फक्त ५ रन करून पव्हेलियनमध्ये परतला. हिलफेन्संहस याने त्याचाच बॉलवर उत्कृष्ट कॅच घेऊन त्याने सेहवागला आऊट केले. तर सचिन हा सुद्धा पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. तो फक्त १४ रनच काढू शकला. त्याला  वॉर्नरने रनआऊट केले.

 

पण ह्या रनआऊटवर सचिन नाखूश होता, कारण की, रन घेण्यासाठी धावताना ब्रेट लीने त्याला अडथळा केल्याने सचिन रनआऊट झाला. आतापर्यंत भारताने ९ ओव्हर खेळून ५१ रनपर्यंत मजल मारली आहे. तर दोन्ही ओपनर बॅट्समन मात्र गमावले आहेत. गंभीर ३ रन आणि कोहली ११ रनवर खेळत आहे. भारताला जिंकण्यासाठी आणखी २०२ रन्सची गरज आहे.

 

सिडनी वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २५३ रनचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे आता भारताला जिंकण्यासाठी चांगल्या सुरवातीची गरज आहे. ऑस्ट्रेलियाच्या खराब सुरवातीनंतर वॉर्नर. डेव्हिड हस्सी आणि वेड यांनी डाव सावरला आणि एका आव्हानात्मक स्कोर उभारण्यास मदत केली.

 

गेल्या काही वन-डे मध्ये भारताची बॅटींग लाइन सुद्धा ढेपाळते आहे. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये भारतीय बॅट्समन काय करणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. ऑस्ट्रेलियाने मर्यादित ५० ओव्हरमध्ये २५२ रन करून ९ विकेट गमावल्या. कांगारूंतर्फे वॉर्नरने सर्वाधिक ६८ रन केले. तर भारताकडून सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

 

सिडनी वन-डेमध्ये भारताने पुन्हा एकदा कमबॅक केला आहे. सुरवातीला ऑसी बॅट्समन गडबडले होते मात्र डेव्हीड हस्सी आणि मायकल वेड यांनी शतकी भागीदारी करून आपल्या टीमला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र उमेश यादवने या दोघांनाही आऊट करून टीम इंडियाला मॅचमध्ये कमबॅक करण्यास मदत केली.

 

वेड आणि हस्सी या दोंघानी अर्घशतकं झळकावली. त्यामुळे ऑसी डावाला आकार मिळाला. आतापर्यंत कांगारूंच्या ७ विकेट गेल्या आहेत. उमेश यादव आणि प्रविण कुमार यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे आता ऑसी बॅट्समन किती मजल मारणार हे  महत्त्वाचं ठरणार आहे

 

सिडनी वन-डेमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सनी समाधानकारक कामगिरी केली आहे. कांगारूंचे आघाडीचे चार बॅट्समन १०७ रन्सवर पॅव्हेलियवनमध्ये परतले होते. डेव्हिड वॉर्नरचा अपवाद वगळता टॉप ऑर्डरच्या एकाही बॅट्समनला भारतीय बॉलर्सनी स्थिरावू दिलं नाही.

 

वॉर्नरनं ६८ रन्सची धाडकेबाज इनिंग खेळली. वॉर्नरचा एक अफलातून झेल सुरेश रैनाने घेतला. वॉर्नर आऊट झाल्यावर मॅथ्यू वेड आणि डेव्हिड हसीनं कांगरूंची इनिंग सावरली आहे. डेव्हिड हस्सी २९ रन तर मॅथ्यू वेड ३२ रनवर खेळत आहे.

 

भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथी वन-डे मॅच सुरू झाली आहे. ही मॅच भारतासाठी करो या मरो या सारखीच आहे. सिडनी वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांचा हा निर्णय त्यांच्या