सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी यांनी २३ वर्षापूर्वी हॅरिस शिल्डमध्ये ६६४ रन्सची विश्वविक्रमी भागिदारी करुन इतिहास घडवला होता. आता इतिहासाची जणू पुनरावृत्ती होताना दिसत आहे पण त्यात वेगळंपण आहे. सचिनने बॅटच्या जोरावर इतिहास घडवला तर त्याचा मुलगा अर्जूनने आपल्या बॉलिंगची कमाल दाखवली. सचिनचा मुलगा अर्जून तेंडूलकरने हॅरिस शिल्डच्या एका सामन्यात धिरुभाई अंबानी शाळेकडून खेळताना अवघ्या २२ धावांच्या मोबदल्यात आठ गडी बाद केले. त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळे जमनाबाई नरसी शाळेचा डाव १०५ रन्समध्ये आटोपला.
अर्जूनच्या तूफान गोलंदाजीने धिरुभाई अंबानी शाळेने सामना जिंकला. अर्जूनने आपल्या संघाच्या बॉलिंगची ओपनिंग केली आणि सलग १२ ओव्हर्स टाकल्या. अर्जूनने घेतलेल्या आठ विकेटसपैकी तिघांना त्याने क्लीन बोल्ड केलं, दोघांना विकेटकिपरने टिपलं आणइ बाकीचे मिड ऑफ आणि कव्हर्सला कॅच आऊट झाले. पण अर्जूनला ही चमक बॅटिंगमध्ये दाखवता आली ही आणि अवघे तीन चेंडू खेळत तो शून्यावर बाद झाला.