मुंबईचा केविलवाणा पराभव, नारायणन ठरला हिरो

Updated: May 16, 2012, 11:59 PM IST

 www.24taas.com, मुंबई

मुंबई इंडियन्स आणि कोलकात नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या लढतीत कोलकत्यानं बाजी मारलीय. कोलकत्यानं मुंबईसमोर ठेवलेल्या १४१ रन्सचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची अक्षरश: दमछाक झाली. आणि ३२ धावांनी मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं.

 

 

कोलकत्याने मुंबईपुढे १४१ धावांचे आव्हान ठेवले होते. मनोज तिवारीनं ४१, कॅप्टन गौतम गंभीरनं २७ तर युसूफ पठाणनं नाबाद २१ धावा काढल्या. मुंबईच्या आरपीसिंगने पहिल्याच ओव्हरमध्ये मॅक्युलम आणि जॅक कॅलिसची विकेट घेतली. त्यामुळे कोलकाताला झटका बसला. पण, शेवटच्या ओव्हरमध्ये युसूफ पठाणने काढलेल्या २१ रन्समुळे कोलकाताने निर्धारित २० ओव्हर्समध्ये ७ आऊट १४० रन्स केले.

 

 

कोलकाताने समोर ठेवलेलं अंतर पार करणं मुंबईला फार कठिण नव्हतं. पण, मुंबईची सुरुवातच खराब झाली. ओपनिंगला आलेला हर्षल गिब्ज १३ रन्सवर आऊट झाला. सचिन तेंडुलकरनं २७, दिनेश कार्तिकनं २०, अंबाती रायडूनं ११ तर रोहित शर्मानं १२ रन्स केले आणि मुंबईचा डाव फक्त १०८ रन्समध्ये गुंडाळला गेला. कोलकत्याच्या नारायणनं ४ विकेटस्  घेतल्या.

 

साहजिकच, या विजयामुळे पॉईंट टेबलमध्ये दुसरं स्थान पटकावत कोलकत्याची प्लेऑफमध्ये जाण्याची आशा उंचावलीय.