'बॅड बॉय' मुनाफ

मुंबईच्या बॅड बॉईजमध्ये सर्वात अग्रेसर आहे तो मुनाफ पटेल... मुनाफनं मैदानावर आपल्या बेताल वागण्यानं अक्षरक्ष: थैमान घातलं.

Updated: May 16, 2012, 09:32 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईच्या बॅड बॉईजमध्ये सर्वात अग्रेसर आहे तो मुनाफ पटेल... मुनाफनं मैदानावर आपल्या बेताल वागण्यानं अक्षरक्ष: थैमान घातलं. मुंबईची टीम टॉप फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी झुंज देत असताना बेशिस्तीमध्ये बिघडलेल्या कारट्यांनी मुंबईला अग्रेसर ठेवलं. यांत आघाडीवर होता आहे तो मुंबईचा फास्ट बॉलर मुनाफ पटेल. या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये मुनाफनं आपल्या दादागिरीनं दहशत निर्माण केली.

 

मुंबई विरुद्ध डेक्कन  

विशाखापट्टणम येथे झालेल्या डेक्कन चार्जर्सविरूद्ध मॅचमध्ये मुनाफने हुज्जत घातली ती अम्पायरशी, कुमार संगकाराला अंपायर्सनी नॉट आऊट दिलं आणि मगं काय… मुनाफचा पारा चढला आणि त्यानंतर मुंबईचा हा ‘बॅड बॉय’ थेट जाऊन भिडला तो अम्पायरशी . त्याच्या या वर्तवणुकीनंतर मॅच रेफ्रीनी मुनाफची 25 टक्के मॅच फी कापून घेतली.

 

मुंबई विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब

पंजाबविरूद्ध खेळताना नितीन सैनीविरूद्ध बॉलिंग करताना मुनाफ पुन्हा एकदा बॅड बॉईजच्या रोलमध्ये दिसला. पंजाबच्या नितीतनं सैनीविरुद्ध त्यानं अर्वाच्य भाषा वापरली. त्यामुळे पुन्हा एकदा मुनाफला दंड ठोठावण्यात आला. त्याला 50 टक्के मॅच फीचा दंड झाला.

 

मुंबई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

गैरवर्तवणुकीमुळे दोनदा दंड झाल्यानंतर सुधारेल तो मुनाफ कसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध खेळताना पुन्हा एकदा मुनाफचा बेशिस्तपणा दिसला. सलग चार नो आणि वाईड बॉल टाकल्यानंतर दिलशाननं  फ्री हिटवर मुनाफला फोर लगावला. दिलशानचा हा फोर मुनाफच्या चांगलाच जिव्हारी लागला. पुन्हा एकदा मुनाफने आपला राग काढला तो अम्पायरवर. या सिझनमध्ये मुनाफ आपल्या बॉलिंगपेक्षा बेताल वागणूकीमुळेच जास्त चर्चेत राहिला. आता तरी मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटनं आपल्य़ा या बिघडलेल्या कारट्याला आवर घालावा, अशीच मुंबईच्या चाहत्यांची अपेक्षा असेल.

 

 

व्हिडिओ पाहा :

 

[jwplayer mediaid="102191"]