युवराज टी-२० वर्ल्डकप खेळणार? संभाव्य यादीत स्थान

कॅन्सरशी लढणारा टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि त्याच्या चाहत्यासाठी एक खुशखबर आहे. युवराज सिंग लवकरच भारतीय टीममध्ये पुनरागमन करणार आहे.

Updated: Jul 18, 2012, 04:27 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

कॅन्सरशी  लढणारा टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि त्याच्या चाहत्यासाठी एक खुशखबर आहे. युवराज सिंग लवकरच भारतीय टीममध्ये पुनरागमन करणार आहे. टीम इंडिया मिडल ऑर्डर बॅट्समन युवराज सिंगनं टीम इंडियात 'कमबॅक' केलाय. टी-२० वर्ल्ड कपसाठी जाहीर झालेल्या ३० संभावित क्रिकेटपटूंमध्ये त्याचा नावाचा सहभाग करण्यात आला आहे.

 

सप्टेंबरमध्ये टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. कॅन्सरवर यशस्वी मात केल्यानंतर युवी टीममध्ये कमबॅक करतो आहे. ३० संभाव्य क्रिकेटपटूंमध्ये त्यानं स्थान पटकावलं आहे. आता प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळतं का? याकडेच त्याच्या चाहत्यांच लक्ष असणार आहे.

 

दरम्यान, युवीबरोबरच बराच काळ क्रिकेटपासून दूर रहाव्य़ा लागणाऱ्या हरभजन सिंगही संभाव्य ३० क्रिकेटपटूमध्ये स्थान पटकावण्यात यशस्वी ठरला आहे.  टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष कृष्णमच्चारी श्रीकांत यांनी याबाबत याआधीच संकेत दिले होते. की, युवराज सिंग याची टी-२०च्या संभाव्य टीममध्ये स्थान दिले जाऊ शकते.

 

सप्टेंबरमध्ये होणाऱ्य़ा टी-२० वर्ल्डकपसाठी नुकतीच युवराजने प्रॅक्टीस ही सुरू केली आहे. युवराज सिंग गेल्या वर्षी अमेरिकेत कॅन्सरवर उपचार करून घेण्यासाठी गेला होता. त्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. वर्ल्डकपच्या दरम्यान युवराज 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' देखील निवडण्यात आला होता. २००७ मध्ये दक्षिण अफ्रिकेत टी-२० वर्ल्डकपमध्येही युवीने आपला जलवा दाखवला होता.