राजस्थान रॉयल्स संघ विक्रीला

आयपील स्पर्धेत चांगली कामगिरी न झाल्याने राजस्थान रॉयल्स संघपुढे प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. संघाचा खर्च उचलने बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला कठीण होत आहे. त्यामुळे आर्थिक डबघाईला आलेला राजस्थान रॉयल्स संघ विक्रिलाच काढवा लागला आहे. त्यामुळे हा संघ कोण विकत घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Updated: Mar 24, 2012, 10:08 AM IST

www.24taas.com, जयपूर

 

आयपील स्पर्धेत चांगली कामगिरी न झाल्याने राजस्थान रॉयल्स संघपुढे प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. संघाचा खर्च उचलने बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला कठीण होत आहे. त्यामुळे  आर्थिक डबघाईला आलेला राजस्थान रॉयल्स संघ  विक्रिलाच काढवा लागला आहे. त्यामुळे हा संघ कोण विकत घेणार याकडे लक्ष लागले आहे.

 

 

राजस्थान रॉयल्सच्या सहमालकांनी कोलकातास्थित एका व्यावसायिकाला फ्रॅन्चायझीतील काही टक्के हिस्सा २०० दशलक्ष डॉलर्सला विकण्यास काढला आहे, अशी चर्चा आहे. हा करार पूर्णत्वास येण्यासाठी फक्त बीसीसीआयची परवानगी आवश्यक आहे. तसे झाल्यास आयपीएलच्या पाच वर्षांच्या इतिहासात फ्रॅन्चायझी विकली जाण्याची ही पहिला घटना ठरेल.  जैन ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक मनोज जैन यांनी राजस्थान रॉयल्सच्या चारपैकी तीन सहमालकांकडील ८८.३ टक्के हिस्सा खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

 

 

ट्रेस्को इंटरनॅशनलचे सुरेश छेलाराम यांच्याकडे सर्वाधिक ४४.२ टक्के हिस्सा आहे. तर मनोज बदाले यांच्या एमर्जिम मीडियाकडे ३२.४ टक्के, लाचलन मुडरेच यांच्या वॉटर इस्टेट लिमिटेडकडे ११.७ टक्के हिस्सेदारी आहे. २००८मध्ये आयपीएलच्या लिलावात ६७ दशलक्ष डॉलर्सला राजस्थान फ्रॅन्चायझी विकत घेतली होती. त्यानंतर तीनपटपेक्षा जास्त म्हणजेच २२६.७० दशलक्ष डॉलर्सना ही फ्रॅन्चायझी विकली जाणार आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी २००९मध्ये १५.४ दशलक्ष डॉलरना ११.७ टक्के हिस्सा विकत घेतला होता. पण ते आपला हिस्सा कायम राखणार आहेत.

 

 

दरम्यान,  राजस्थान रॉयल्सची फ्रॅन्चायझी विकत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण बीसीसीआयने या कराराचे योग्य मूल्यमापन करायला हवे. सहमालकांनी आपला हिस्सा विकण्याची तयारी दर्शवली असून त्यांची बीसीसीआयशी बोलणी सुरू आहेत. आता चेंडू बीसीसीआयच्या कोर्टात आहे,  असे मनोज जैन यांचे म्हणणे आहे. ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या पाचव्या मोसमावर लक्ष केंद्रित केले आहे, असे राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने पहिल्याच मोसमात आयपीएलचे जेतेपद पटकावले होते.