राजस्थान रॉयल्सचा एक रन्सने पराभव

टी-२० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने आपली विजयी मालिका कायम राखली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सचा केवळ एका रन्सने पराभव केला.

Updated: Apr 30, 2012, 11:26 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

टी-२० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने आपली विजयी मालिका कायम राखली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सचा केवळ एका रन्सने पराभव केला.

 

 

प्रथम फलंदाजी करताना वीरेंद्र सेहवाग आणि योगेश नागरच्या फटकेबाजीने दिल्लीने २०षटकांत  ६ बाद १५२रन्सची मजल मारली होती. राजस्थान रॉयलने शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यांचा डाव ३  बाद १५१ असा मर्यादित राहिला. अजिंक्‍य रहाणेची ८४ रन्सची नाबाद खेळी व्यर्थ ठरली.

 

 

वीरेंद्र सेहवाग बाद झाल्यावर दिल्लीकरांना १५२ रन्सवर रोखल्यावर कर्णधार राहुल द्रविड आणि अजिंक्‍य रहाणे यांनी राजस्थानला झकास सुरवात करून दिली होती. त्यांच्या खेळात आक्रमकता नसली, तरी विकेट राखल्यामुळे त्यांचे पारडे जड राहिले होते. षटकामागे सातच्या धावगतीने खेळताना या जोडीने ९९ रन्सची सलामी दिली. त्या वेळी द्रविड ४० रन्सची खेळी करून बाद झाला. त्या वेळी आवश्‍यक धावांचा वेग वाढला होता. अचूक गोलंदाजी आणि तेवढेच चोख क्षेत्ररक्षण यामुळे दिल्लीकरांनी राजस्थानच्या रहाणे आणि हॉज जोडीला जखडून ठेवण्यात यश मिळविले होते. दोन षटकांत विजयासाठी १५ रन्सची आवश्‍यकता असताना मॉर्ने मॉर्केलने टाकलेले १९ वे आणि उमेश यादवचे अखेरचे षटक निर्णायक ठरले.

 

 

मॉर्केलने केवळ तीन धावा देत हॉजची विकेट मिळविली. त्यानंतर विजयासाठी सहा चेंडूत १२धावांची आवश्‍यकता असताना उमेश यादवच्या गोलंदाजीवर एका षटकारासह दहा रन्स निघाल्याने अखेरच्या चेंडूवर राजस्थानला दोन चेंडू हव्या होत्या. उमेशने अचूक टप्प्यावर चेंडू टाकून रहाणेला चकवले. त्या वेळी रहाणे बाय रन घेण्यासाठी धाव घेतली. पण, यष्टिरक्षक नमन ओझाने जमिनीलगत थ्रो करून शाहला धावबाद केले आणि दिल्लीच्या रोमहर्षक विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

 

वीरेंद्र सेहवागच्या आणखी एका झंझावती खेळीने दिल्ली डेअरडेव्हिल्सला आव्हानात्मक धावसंख्या उभी करता आली. प्रथम फलंदाजी करताना पंकज सिंगने राजस्थानला झकास सुरवात करून दिली. त्याने जयवर्धनेला बाद केले. त्यानंतर अंकित चव्हाणने केविन पीटरसनला स्थिरावू दिले नाही. मात्र, त्यांना सेहवागला रोखता आले नाही. त्याने ६३  रन्सची खेळी करताना टेलरच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी ६० रन्स केल्या.