शेवटी केस गेले. पण, हिंमतीने जगतोय

टीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंग याच्यावर सध्या अमेरिकेमध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरवरील इलाज चालू आहेत. इलाजादरम्यान त्याने आपले नवे फोटो शुक्रवारी ट्विटरवर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये युवराजचं डोकं मात्र भादरलेलं आहे.

Updated: Feb 10, 2012, 11:31 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

टीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंग याच्यावर सध्या अमेरिकेमध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरवरील इलाज चालू आहेत. इलाजादरम्यान त्याने आपले नवे फोटो शुक्रवारी ट्विटरवर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये युवराजचं डोकं मात्र भादरलेलं आहे.  ‘ट्विटरवर युवीने लिहीलं आहे, - शेवटी केस गेले. पण, #हिंमतीने जगतोय#/युवीस्ट्राँग

 

युवराजवर इलाज करण्याबरोबरच त्याला मानसिक आधार देण्यासाठीही डॉक्टरांची टीम मदत करत आहे. युवीने लवकरात लवकर बरं व्हवं यासाठी त्याचे मित्रच नव्हे तर सबंध देश प्रार्थना करत आहे. युवराज गेल्या नोव्हेंबरपासून ते अद्याप कुठलीही टुर्नामेंट खेळू शकला नाही. युवराज पुन्हा मैदानात उतरून कधी नेहमीसारखे चौकार-षटकार लगावणार याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. युवीच्या डॉक्टरांच्या मते मे महिन्यापर्यंत युवराज एकदम फिट होऊन नेहमीच्याच आक्रमकतेने मैदानात उतरू शकेल.

 

युवराजने ३७ टेस्ट मॅचेसमध्ये ३४.८० च्या सरासरीने १७७५ रन्स काढल्या आहेत. २७४ वन डे मॅचेसमध्ये ३७.६२ च्या सरासरीने ८०५१ रन्स काढल्या आहेत. आणि २३ ट्वेंटी २० मॅचेसमध्ये ५६७ रन्स काढल्या आहेत.