सचिनला वाट पाहावी लागणार 'भारतरत्न'साठी

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' मिळावा यासाठी प्रयत्न केले जात होते, त्यासाठी भारतरत्न मिळण्याच्या कायद्यात बदल देखील करण्यात आले. परंतु आता मात्र सचिन तेंडुलकर याला भारतरत्न सध्या तरी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Updated: Jan 25, 2012, 12:06 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' मिळावा यासाठी प्रयत्न केले जात होते, त्यासाठी भारतरत्न मिळण्याच्या कायद्यात बदल देखील करण्यात आले. परंतु आता मात्र सचिन तेंडुलकर याला भारतरत्न सध्या तरी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण की सचिनचे नाव भारतरत्नच्या यादीमध्ये नाहीये, त्यामुळे भारतरत्न मिळण्यासाठी सचिनला आणखी काय वेळ वाट पाहावी लागणार आहे.

 

क्रीडा मंत्रालयानं भारररत्न सन्मानासाठी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद आणि एव्हरेस्टवीर तेनसिंग नॉर्गे यांच्या नावाची शिफारस केली आहे. महत्वाचं म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाचा विचार  शिफारस करण्यात आली नाही. त्यामुळे सचिनचे चाहते निराश झाले आहेत.

 

बीसीसीआयनंच सचिन तेंडुलकरचं नावं क्रीडा मंत्रालयाकडे पाठवलं नसल्याचंही स्पष्ट होतं आहे. बीसीसीआय सदस्य राजीव शुक्ला यांनी क्रीडा मंत्रालयानंच सचिनच्या नावाची भारतरत्न सन्मासाठी पाठवणं अपेक्षीत असल्याच म्हटलं आहे. ध्यानचंद यांनी १९२८, १९३२, आणि १९३६ मध्ये भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.