'सिनियर हटाव नारा निराधार'

ऑस्ट्रेलियातील मानहानिकारक पराभवाला ख-याअर्थानं टीम इंडियातील सिनियर क्रिकेटपटूच जबाबदार ठरले आहेत. एकाही सिनियर क्रिकेटपटूनं लौकीकाला साजेशी कामगिरी केली. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएसल लक्ष्मणला तर टीम मधून हटविण्याची मोहिमही आता सुरु झाली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्यासह टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू निवृत्तीचा विचार करीत असल्याचे वृत्त निराधार असल्याचे टीम इंडियाच्या व्यवस्थापकांनी आज सांगितले.

Updated: Jan 28, 2012, 04:07 PM IST

www.24taas.com, ऍडलेड

ऑस्ट्रेलियातील मानहानिकारक पराभवाला ख-याअर्थानं टीम इंडियातील सिनियर क्रिकेटपटूच जबाबदार ठरले आहेत. एकाही सिनियर क्रिकेटपटूनं लौकीकाला साजेशी कामगिरी केली. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएसल लक्ष्मणला तर टीम मधून हटविण्याची मोहिमही आता सुरु झाली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्यासह टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू निवृत्तीचा विचार करीत असल्याचे वृत्त निराधार असल्याचे टीम इंडियाच्या व्यवस्थापकांनी आज सांगितले.

ऍडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाला २९८  रन्सने पराभव सहन करावा लागला आहे. या पराभवासह भारताला इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियातही व्हाईटवॉशला सामोर जाव लागलं आहे. दुस-य़ा इनिंगमध्ये टीम इंडटाला केवळ २०१ रन्सच करता आले.  भारताचा हा परदेशातील सलग आठवा पराभव ठरला आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियात तब्बल ४४ वर्षांनी भारताला ०-४नं टेस्ट सीरिज गमवावी लागली आहे. या  सीरिजमध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. भारताच्या बॅट्समन आणि बॉलर्सना काहीच कमाल करता आली नाही. एकाही सिनियर क्रिकेचपटूला या सीरिजमध्ये लौकीकाला साजेशी कामगिरी झालेली नाही. या खराब कामगिरीमुळेच सिनियर हटाव मोहिमही सुरु झाली आहे.

इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियात व्हाइटवॉश मिळाल्यामुळे टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर निवृत्तीचा विचार करीत असल्याचे वृत्त काल होते. यासंदर्भात माहिती देताना टीम इंडियाचे व्यवस्थापक जी. एस. वालिया म्हणाले, निवृत्तीचे वृत्त निराधार आहे. टीम इंडियाचे व्यवस्थापन याचे स्पष्ट शब्दांत खंडन करते. निवृत्तीच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यात काही तथ्य नाही. क्रिकेटप्रेमींनी त्यावर विश्‍वास ठेवू नये. मात्र,  टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूच्या निवृत्तीच्या वृत्ताचाही सेहवागने इन्कार केला आहे.