सचिन, बोल्डपेक्षा श्रीमंतीत धोनी अव्वल

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपणच श्रीमंत असल्याचे दाखवून दिले आहे. धोनीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणार उसेन बोल्ड यालाही मागे टाकले आहे. ‘फोर्ब्स’ या मासिकाने जाहीर केलेल्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये भल्या-भल्या खेळाडूंना धोनीने मागे टाकले आहे. टेनिस विश्वात अव्वल क्रमांकावर विराजमान असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच यांच्यापुढे धोनीने स्थान पटकावले आहे.

Updated: Jun 20, 2012, 11:09 AM IST

www.24taas.com, लंडन

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपणच श्रीमंत असल्याचे दाखवून दिले आहे. धोनीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणार उसेन  बोल्ड यालाही मागे टाकले आहे.  ‘फोर्ब्स’ या मासिकाने जाहीर केलेल्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये भल्या-भल्या खेळाडूंना धोनीने मागे टाकले आहे. टेनिस विश्वात अव्वल क्रमांकावर विराजमान असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच यांच्यापुढे धोनीने स्थान पटकावले आहे.

फोर्ब्सच्या यादीनुसार धोनी श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये ३१व्या स्थानावर आहे, तर जोकोव्हिच ६२व्या, बोल्ट ६३व्या आणि सचिन ७८व्या स्थानावर आहेत. अव्वल फुटबॉलपटू वेन रूनी आणि फर्नाडो टोरेस यांनाही धोनीने श्रीमंतीत मागे टाकले आहे. तर टेनिसपटू रॉजर फेडरर या यादीत पाचव्या स्थानावर असून फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आठव्या आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो नवव्या स्थानावर आहे.

बॉक्सिंगपटू फ्लॉइड मेवेदर ८५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर फिलिपाइन्सचा बॉक्सिंगपटू मॅनी पॅकक्यूइरो ६२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसरे स्थान पटकावलेल्या गोल्फचा  सम्राट असलेल्या टायगर वूड्सने ५९.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. २६.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारा धोनी ३१व्या स्थानावर असून सचिनने १८.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी कमाई केलेली आहे.

फोर्ब्सच्या यादीतील अव्वल दहा श्रीमंत खेळाडू

फ्लॉइड मेवेदर  ( बॉक्सिंग - ८५ दशलक्ष),  मॅनी पॅकक्यूइरो (बॉक्सिंग - ६२ दशलक्ष), टायगर वूड्स (  गोल्फ- ५९.४ दशलक्ष), लेबरॉन जेम्स   (बास्केटबॉल- ५३ दशलक्ष), रॉजर फेडरर (  टेनिस - ५२.७ दशलक्ष), कोब ब्रायंट ( बास्केटबॉल  -५२.३ दशलक्ष), फिल मिकेल्सॉन (गोल्फ - ४७.८ दशलक्ष), डेव्हिड बेकहॅम (फुटबॉल  - ४६ दशलक्ष), ख्रि. रोनाल्डो ( फुटबॉल -  ४२.५ दशलक्ष), पेयटॉन मॅन्निंग   (फुटबॉल -४२.४ दशलक्ष)