मुस्लीम युवकांना त्र्यंबकेश्वर मंदिरात का जायचं होतं? जबरदस्ती प्रवेश प्रकरणी चौघांवर हा गुन्हा दाखल

त्र्यंबकप्रकरणी FIR दाखल करुन SIT चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिरात जबरदस्ती प्रवेश करणा-या चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: May 16, 2023, 08:47 PM IST
मुस्लीम युवकांना  त्र्यंबकेश्वर मंदिरात का जायचं होतं? जबरदस्ती प्रवेश प्रकरणी चौघांवर हा गुन्हा दाखल title=

Nashik Trimbakeshwar Controversy : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात काही मुस्लिम युवकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर जबरदस्ती प्रवेश प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

चौघांवर गुन्हा दाखल

चौघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवेशाची आगळीक केल्यानं अटकेची कारवाई होणार आहे. महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाच्या जवानांनी विरोध केल्यानंतरही या युवकांनी मंदिरात प्रवेश केला होता. वाढत्या दबावामुळे अखेर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 2 तासांनी भारतीय दंड संहिता कलम 295 ,511 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

त्र्यंबकेश्वर मंदिरात काही मुस्लिम युवकांनी जबदरस्तीनं घुसण्याचा प्रयत्न का केला?

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात काही मुस्लिम युवकांनी जबदरस्तीनं घुसण्याचा प्रयत्न केला. मुख्य प्रवेशद्वारातून हे युवक आत घुसले. मुस्लिम युवकांच्या मंदिर प्रवेशावरुन वाद निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली. चादर आणि पुष्पहार घेऊन हे मुस्लिम युवक मंदिरात जाण्याचा प्रयत्न करत होते. धूप देण्यासाठी आत जाऊ द्या अशी मागणी या युवकांनी केली. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलं. काही वेळ हे मुस्लिम युवक इथेच थांबले. मंदिर प्रवेश मिळत नाही हे पाहून तिथून निघून गेले. दरवर्षी मंदिराच्या पायरीवरुन त्र्यंबक महाराजांना आम्ही हजरत सैय्यद गुलाब शहावली बाबांची धुनी देत असतो असं या मुस्लिम युवकांचं म्हणणं आहे. तर अचानक काही वर्षांपासून हा प्रकार सुरु झालाय, जाणीवपूर्वक चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

राज्यात 2 महिन्यात 3 दंगली

राज्यात 2 महिन्यात 3 दंगली घडल्या आहेत. हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला होता. त्यात त्र्यंबकेश्वर मंदिर घटनेमुळे खळबळ उडाली. त्यामुळे धार्मिक भावना दुखावतील असं कृत्य कोणत्याच बाजूनं होऊ नये, राज्यातलं धार्मिक सलोख्याचं वातावरण बिघडेल अशी कृती करु नये, असं आवाहन झी २४ तास करत आहे.