नाशिक: रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याच्या घटना नेहमीच कानावर पडतात. पण नाशिकमध्ये डॉक्टरनं रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये संबंधित नातेवाईक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेचं नाव मुक्ता राऊत असे आहे. याप्रकरणी तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या महात्मानगर परिसरातल्या सिक्स सिग्मा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या महिलेने बेसिनमध्ये हात न धुता दुसरीकडेच हात धुतल्याने डॉक्टरने महिलेच्या डोक्यात चक्क खुर्ची घातली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मारहाण स्पष्ट दिसतेय. महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दोन डॉक्टरांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाला माराहाणीची घटना कदाचित पहिल्यांदाच घडली असावी. त्यामुळे शहरात खळबळ उडालीय.