नाशिक : भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपति वेंकैय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी शिवराळ खासदार संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करा अशी मागणी केलीय.
पत्रकार परिषदेतुन खुलेआम शिवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे साधु संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत. वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य या संवैधानिक पदावर राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही.
राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपति वेंकैया नायडू यांनी अशा शिवराळ खासदार संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करावे, अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी या पत्रातून केली आहे.