close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भरलेल्या मैफिलीत आफ्रिदी हे करताना दिसला, व्हिडिओ व्हायरल

 फॅन्सही यावरून त्याची खिल्ली उडवत आहेत.

Updated: Sep 10, 2018, 12:17 PM IST
भरलेल्या मैफिलीत आफ्रिदी हे करताना दिसला, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : 'आपण कितीही काही लपवण्याचा प्रयत्न केला तरी वरचा सर्व पाहत असतो' असं आपल्याकडे म्हटलं जातं. पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदीसाठी हे तंतोतंत लागू आलंय आणि त्यामूळे तो ट्रोलही होतोयं. एका भरलेल्या मैफिलमध्ये कोणी आपल्याकडे बघत नाहीयं हे पाहून आफ्रिदी हळूच चिमूटभर तंबाखू हळूच तोंडात कोंबतोय. पण कॅमेराने मात्र त्याच काम करत सर्वांच लक्ष अचूक लक्ष वेधलयं. हे फूटेज आता सोशल मीडियात व्हायरल होतंय.

फॅन्सनी उडवली खिल्ली 

पाकिस्तानमध्ये 6 सप्टेंबरला रक्षा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान आफ्रिदीने हाताच्या चिमटीत तंबाखू पकटून तोंडात वरच्या बाजूस कोंबला. त्याला वाटलं आपल्याकडे कोणाचं लक्ष नाहीयं पण वरचा सर्व काही पाहत होता. वर असलेला कॅमरा सर्व क्षण झूम करुन टीपत होता. आफ्रीदीचा हा कारनामा सध्या व्हायरल होतोय. त्याचे फॅन्सही यावरून त्याची खिल्ली उडवत आहेत.

वाद आणि आफ्रिदी 

वाद आणि आफ्रीदी हे जुनं नातं आहे. त्यामुळे त्याच्यासोबत कॉन्ट्रवर्सी होण्याची ही काही पहिलीचं वेळ नाही. आपल्या करिअरच्या सुरूवातीलाच तो एका सेक्स स्कॅंडलमध्ये फसला होता. याशिवाय त्याला बॉल टेम्परिंग करतानाही पकडण्यात आलं होतं. मैदानातपण खेळाडूंशी भांडताना त्याला खूपदा पाहिलं गेलंय. भारताविरूद्धीही त्याने बरीच वक्तव्य केली आणि त्याला टीकेचा धनीही व्हावं लागलं.