'भारत' चित्रपट सर्वत्र प्रदर्शित, पाहा फोटो

चित्रपटात अभिनेता सलमान खान आणि कतरिना मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत.

Jun 05, 2019, 12:53 PM IST

मुंबई : 'जितने सफेद बाल मेरे सर और दाढी मे हैं, उससे कही ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही है... ' असं म्हणत 'बजरंगी भाईजान'चा 'भारत' चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाला. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट चाहत्यांचे किती मनोरंजन करेल हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटात अभिनेता सलमान खान आणि कतरिना मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. डायलॉग आणि अॅक्शनने परिपूर्ण असणाऱ्या चित्रपटातील काही निवडक फोटो..

1/8

सलमान करणार कटरिना आणि दिशासह रोमांस

सलमान करणार कटरिना आणि दिशासह रोमांस

चित्रपटात सलमान चक्क कटरिना आणि दिशासह रोमांस करताना दिसणार आहे. चित्रपट डायलॉग आणि अॅक्शनने परिपूर्ण असणार आहे.    

2/8

चित्रपटात अनेक कलाकारांची मेजवानी

चित्रपटात अनेक कलाकारांची मेजवानी

सलमान आणि कतरिना यांच्याशिवाय दिशा पटनी, नोरा फतेही, वरूण धवन, जॅकी श्रॉफ, तब्बू आणि सुनील दत्त हे कलाकार झळकणार आहेत. 

3/8

'टायगर जिंदा हैं' नंतर 'भारत' चित्रपटात सलमान - कतरिना एकत्र

'टायगर जिंदा हैं' नंतर 'भारत' चित्रपटात सलमान - कतरिना एकत्र

'टायगर जिंदा हैं' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. सलमान खान, कतरिना कैफ आणि अली अब्बास यांनी 'टायगर जिंदा हैं' चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र स्क्रिन शेअर केली होती.  

4/8

सलमानचे वेगवेगळे अंदाज

सलमानचे वेगवेगळे अंदाज

चित्रपटात सलमानचे  वेगवेगळे अंदाज चाहत्यांना अनुभवता येणार आहेत. त्याचप्रमाणे कलाकारांच्या पेहरावापासून त्यांच्या लूकमध्ये होणारे बदल हे पाहणे मनोरंजक ठरत आहे.

5/8

तरूणाई पासून म्हातारपणा पर्यंतचा सलमाचा प्रवास

तरूणाई पासून म्हातारपणा पर्यंतचा सलमाचा प्रवास

विशेष म्हणजे सलमान तरूणाईपासून ते ७० वर्षाच्या वृद्धाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.   

6/8

'भारत' चित्रपटाचे सोशल मीडियावरील क्रेझ

'भारत' चित्रपटाचे सोशल मीडियावरील क्रेझ

चित्रपटाचा ट्रेलर आणि टिझर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. ट्रेलरच्या काही भागांवर मीम देखील व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे.   

7/8

देशाच्या फाळणीचा प्रसंग

देशाच्या फाळणीचा प्रसंग

अर्ध्याहून अधिक चित्रपट हा भूतकाळात दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये देशाच्या फाळणीचा प्रसंगही पाहता येतो. 

8/8

२०१४ पर्यंतचा काळ रूपेरी पडद्यावर झळकणार

२०१४ पर्यंतचा काळ रूपेरी पडद्यावर झळकणार

'भारत' चित्रपट 'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा रिमेक असणार आहे. 'भारत' चित्रपटात देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून ते २०१४ पर्यंतचा काळ रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.