Bharat screening: मराठमोळ्या अभिनेत्रीसह 'भारत'साठी सेलिब्रिटींची मांदियाळी

Jun 05, 2019, 11:27 AM IST
1/11

Bharat screening: मराठमोळ्या अभिनेत्रीसह 'भारत'साठी सेलिब्रिटींची मांदियाळी

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' हा चित्रपट ईदच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आला. या मल्टीस्टारर चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खानही काही नव्या रुपांमध्ये चाहत्यांसमोर आला. अशा या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं स्क्रीनिंगही मोठ्या दणक्यात पार पडलं. यावेळी कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली. 'भारत'च्या स्क्रीनिंगमध्ये एक मराठमोळी अभिनेत्रीही पाहायला मिळाली. फक्त स्क्रीनिंगच नव्हे, तर चित्रपटातूनही ती झळकत आहे. चला तर मग, स्क्रीनिंगच्या निमित्ताने पाहूया या सेलिब्रिटींच्या अदा आणि त्यांचा रेड कार्पेट लूक.... (छाया सौजन्य- योगेन शाह)

2/11

Bharat screening: मराठमोळ्या अभिनेत्रीसह 'भारत'साठी सेलिब्रिटींची मांदियाळी

सलमान खानची बहीण आणि या चित्रपटाच्या निर्मितीत योगदान असणाऱ्या अल्विरा खान अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री याची या स्क्रीनिंगला उपस्थिती होती. (छाया सौजन्य- योगेन शाह)

3/11

Bharat screening: मराठमोळ्या अभिनेत्रीसह 'भारत'साठी सेलिब्रिटींची मांदियाळी

अभिनेत्री दिशा पटनी स्क्रीनिंगच्या निमित्ताने तिचा बहुचर्चित प्रियकर टायगर श्रॉफ याच्यासोबत आली होती. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा स्ट्रॅपलेस टॉप आणि निळसर रंगाची रिप्ड जीन्स घातली होती. (छाया सौजन्य- योगेन शाह)

4/11

Bharat screening: मराठमोळ्या अभिनेत्रीसह 'भारत'साठी सेलिब्रिटींची मांदियाळी

चित्रपटात सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत झळकणाऱ्या जॅकी श्रॉफ यांनीही स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- योगेन शाह)

5/11

Bharat screening: मराठमोळ्या अभिनेत्रीसह 'भारत'साठी सेलिब्रिटींची मांदियाळी

सलमानसोबत स्क्रीन शे्र करत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री कतरिना कैफ या स्क्रीनिंगच्या निमित्ताने सुरेख लूकमध्ये आली होती. यावेळी तिने सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीच्या कलेक्शमधील काळ्या रंगाता फ्लोरल प्रिंट असणारा लेहंगा घातला होता. (छाया सौजन्य- योगेन शाह)

6/11

Bharat screening: मराठमोळ्या अभिनेत्रीसह 'भारत'साठी सेलिब्रिटींची मांदियाळी

स्ट्रॅपलेस क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये अभिनेत्री नोरा फतेहीसुद्धा अतिशय सुरेख दिसत होती. (छाया सौजन्य- योगेन शाह)

7/11

Bharat screening: मराठमोळ्या अभिनेत्रीसह 'भारत'साठी सेलिब्रिटींची मांदियाळी

रेड कार्पेटवर सेलिब्रिटींच्या या गर्दीत साऱ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या त्या म्हणजे अभिनेता सलमान खान याच्यावर. (छाया सौजन्य- योगेन शाह)

8/11

Bharat screening: मराठमोळ्या अभिनेत्रीसह 'भारत'साठी सेलिब्रिटींची मांदियाळी

'भारत'मध्ये सलमानच्या भावाच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता शशांक अरोरासुद्धा स्क्रीनिंगला आला होता. (छाया सौजन्य- योगेन शाह)

9/11

Bharat screening: मराठमोळ्या अभिनेत्रीसह 'भारत'साठी सेलिब्रिटींची मांदियाळी

मराठमोळी अभिनेत्री, सोनाली कुलकर्णी ही तिच्या पतीसह स्क्रीनिंगसाठी आली होती. ती या चित्रपटात सलमानच्या आईची भूमिका साकारत आहे. (छाया सौजन्य- योगेन शाह)

10/11

Bharat screening: मराठमोळ्या अभिनेत्रीसह 'भारत'साठी सेलिब्रिटींची मांदियाळी

भाईजान सलमानच्या खास मित्राच्या भूमिकेत झळकणारा विनोदवीर सुनील ग्रोव्हरसुद्धा स्क्रीनिंगच्या वेळी आला होता. (छाया सौजन्य- योगेन शाह)

11/11

Bharat screening: मराठमोळ्या अभिनेत्रीसह 'भारत'साठी सेलिब्रिटींची मांदियाळी

बहुचर्चित आणि एका गुलदस्त्यात असणाऱ्या भूमिकेमुळे लक्ष वेधणाऱ्या अभिनेत्री तब्बूचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. (छाया सौजन्य- योगेन शाह)