मालपोवा, फिरनी... यासारख्या लज्जतदार पदार्थांनी रमजानमध्ये सजतो मोहम्मद अली रोड

Ramdan 2024 : रमजानचा महिना सुरु होत आहे. या दिवसांमध्ये खवय्यांसाठी मोहम्मह अली रोडचा मार्ग लज्जतदार पदार्थांनी सजलेला असतो. त्याठिकाणी मिळणाऱ्या 15 पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत. 

| Mar 10, 2024, 12:45 PM IST

रमजानमध्ये उपवास करणे हा इस्लाममध्ये अतिशय पवित्र समजले जाते. मुस्लिम धार्मिक विधी त्यांच्या अध्यात्माशी पुन्हा जोडण्यासाठी पवित्र महिन्यात करतात. जगभरातील मुस्लिम लोक सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. हा प्रार्थना, नम्रता आणि संयमाचा महिना आहे. पण खाद्यप्रेमींसाठी, हा एक असा काळ आहे जिथे 'इफ्तार' मेजवानीसाठी सर्वात स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. आणि त्याची चव चाखली जाते.

सूर्योदयापूर्वी जे जेवण केले जाते त्याला ‘सेहरी’ म्हणतात. दिवसभरात मात्र काही खाल्ले जात नाही. सूर्यास्त आणि प्रार्थनेनंतर, इफ्तारच्या मेजवानीने उपवास सोडला जातो ज्यामुळे कुटुंब एकत्र येऊन जेवण करतात. 

मुंबईतील मोहम्मद अली रोड असंच एक ठिकाण आहे जिथे तुम्ही एकत्र येऊन वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी पहिल्यांदाच जाणार असाल तर तेथे मिळणाऱ्या 15 खास पदार्थांपैकी जाणून घ्या. तसेच तेथे कसे पोहोचाल, ते देखील समजून घ्या? 

1/13

मालपुवा-रबडी

foods to try at Mohammed Ali Road

दरवर्षी या ठिकाणाला भेट देण्याचे अनेकांचे एक मुख्य कारण म्हणजे मालपोवा-रबडी... मालपुवा हा पदार्थ गोड पदार्थातील सर्वोत्तम आहे.  गोडातील पिवळ्या रंगाचा, तळलेला असा हा पदार्थ साखरेच्या पाकात भिजवला जातो. एवढंच नव्हे तर हा पदार्थ रबडी सोबत खाल्ला जातो. गव्हापासून तयार होणारा हा पदार्थ रमजानमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. 

2/13

नल्ली निहारी

foods to try at Mohammed Ali Road

जर तुम्ही मटणाचे चाहते असाल तर हीच डिश आहे ज्याच्या तुम्ही प्रेमात पडाल. रमजान दरम्यान खूप लोकप्रिय नॉन व्हेज पदार्थ म्हणजे नल्ली निहारी. मांसाहारी असलेल्या या पदार्थासोबत रुमाली रोटी किंवा बटर रोटी खाऊ शकता. 

3/13

मटण खीमा पाव

foods to try at Mohammed Ali Road

खीमा प्रेमींसाठी हा पदार्थ अतिशय आवडीचा आहे. मटण खीमा किंवा चिकन खीमा देखील मोहम्मद अली रोडला चाखू शकता. भरपूर मसाल्यामध्ये तयार झालेला हा पदार्थ पावासोबत खाऊ शखता. 

4/13

कबाब, चिकन टिक्का आणि तंदुरी चिकन

foods to try at Mohammed Ali Road

कबाब आणि तंदुरी चिकन कोणाला आवडत नाही? कबाब प्रेमींसाठी ही सुवर्ण संधी आहे. सीख कबाब, पहाडी कबाब, शम्मी कबाब, मलाई कबाब, चिकन टिक्का, तंदूर इत्यादी मसाले, मॅरीनेड आणि नंतर बार्बेक्यूमध्ये पदार्थ आकर्षणाचा विषय असतो.

5/13

मावा जिलेबी

foods to try at Mohammed Ali Road

जिलेबी प्रेमी असाल तर मोहम्मद अली रोडवर बुरहानपूर मावा जिलेबी येथे मिळणारी मावा जिलेबी नक्की खा. मावा, अरारोट आणि दूध वापरून बनवलेले, जे त्यांना एक वेगळी, गोड चव देतात. बुरहानपूर मावा जिलेबीशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी जाऊ नका. या दुकानावरील चिन्हावर ‘मावा जलेबीचा राजा’ असे लिहिले आहे. येथे जाऊन जिलेबीचा आस्वाद घेतल्यावर हे खरं वाटेल.   

6/13

फिरनी

foods to try at Mohammed Ali Road

तांदूळ, दूध, मलई, साखर आणि केशर वापरून अतिशय आनंददायी फिरणी बनवली जाते. मोहम्मद अली रोडवरील बहुतेक मिठाईची दुकाने मातीच्या भांड्यात फिरणी देतात, ज्यामुळे चव अधिक वाढते. 

7/13

मसाला मिल्क

foods to try at Mohammed Ali Road

मोहम्मद अली रोड फिरून थकला असाल तर मसाला मिल्क नक्की प्या. थंडगार काचेच्या बाटलीमध्ये सर्व्ह केले जाते, ही उष्णता कमी करण्यासाठी एक परिपूर्ण पदार्थ आहे. केसर आणि हळदीसह त्यांच्या खास मसाल्याने दुधाला चव येते ज्यामुळे ते पिवळे पेय बनते.

8/13

नूर मोहम्मदी हॉटेलमध्ये संजू बाबा चिकन

foods to try at Mohammed Ali Road

या पदार्थाचा संबंध अभिनेता संजय दत्तसोबत आहे. नूर मोहम्मदी हॉटेल हे इथले सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्यांचे संजू बाबा चिकन. संजय दत्तच्या शहरातील आवडत्या ठिकाणांपैकी एक; 1986 पासून ते या रेस्टॉरंटला भेट देत आहेत. पूर्वी त्याने मालकांसोबत एक खास रेसिपी शेअर केली होती आणि ते त्याच्या नावावरून एक स्वादिष्ट चिकन करी तयार करण्यासाठी वापरत आहेत.

9/13

भेजा भ्राज

foods to try at Mohammed Ali Road

भेजा भ्राज हा देखील असाच एक मटणाचा पदार्थ आहे. बकऱ्याचा भेजा ग्रेव्ही आणि फ्राय स्वरुपात मिळतो. हा पदार्थ रोटी किंवा नानसोबत खाता येतो. 

10/13

ताज आईसक्रिम

foods to try at Mohammed Ali Road

हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण 130 वर्षांहून अधिक काळ आइस्क्रीम विकत आहे. खऱ्या आणि मोसमी फळांपासून बनवलेल्या आणि रिच फ्रोझन स्मूदी सारख्या स्वादिष्ट घरगुती सांचा आईस्क्रीमसाठी ओळखले जाते.

11/13

तंदूरी क्विल

foods to try at Mohammed Ali Road

तंदुरी चिकनप्रमाणेच हा पदार्थ आहे. क्विल या लहान पक्ष्याला मॅरीनेट केलं जातं. हा पदार्थ तंदूरवर शिजवले जाते. 

12/13

गुरदा

foods to try at Mohammed Ali Road

गुरडा ही बकऱ्याच्या किडनीची मसालेदार करी आहे, ज्याचा चाहता प्रत्येक वर्षी रमजानमध्ये मोहम्मद अली रोड येथे आनंद घेण्यासाठी जातो. 

13/13

बैदा रोटी

foods to try at Mohammed Ali Road

नाव सुचवल्याप्रमाणे, बैदा रोटी म्हणजे चिकन/मटण भरून अंड्याच कोटी असलेला हा पदार्थ आहे. रोटी म्हणजे तळलेल्या रोटीचा पदार्थ अतिशय चविष्ट लागतो.