या लहान मुलाच्या पाठीशी सारं जग उभं; त्याची खरी ओळख पाहून तुमचेही डोळे चमकतील

Dalai Lama Birthday : अशा व्यक्ती त्यांच्या जगण्यातून काही अशा गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवतात ज्यामुळं इतरांच्याही जीवनाचं सार्थक होतं. अडीअडचणींतून वाट काढण्याचं बळ मिळतं. हा चेहरा त्यापैकीच एक. 

Jul 06, 2023, 14:07 PM IST

Dalai Lama Birthday : सोशल मीडियावर काही व्यक्तींचे उदगार, त्यांची वचनं आणि त्यांनी आयुष्याबाबत सांगितलेली मुल्य अनेकांच्याच आदर्शस्थानी येतात. 

1/7

हा चेहरा आहे...

14  th dalai lama real name and interesting facts india china clash

हा चेहरा आहे, 14 वे तिबेटन धर्मगुरू दलाई लामा यांचा. मागील 64 वर्षांपासून भारतातील हिमाचल प्रदेशमध्ये वास्तव्यास असणारे दलाई लामा अनेकांसाठी वंदनीय, तर कुणाचे आदर्श. 6 जुलै 1935 रोजी त्यांचा जन्म झाला. ल्हामो थोंडुप अशी त्यांची खरी ओळख. तेनजिन ग्यात्सो म्हणूनही त्यांना संबोधलं जात होतं. 1937 मध्ये जेव्हा तिबेटच्या धर्मगुरुंनी दलाई लामांना पाहिलं तेव्हा त्यांना त्यांच्यात थुबतेन ग्यात्सोचं रुप दिसलं आणि अनेक टप्पे ओलंडल्यानंतर त्यांना धार्मिक शिक्षण देण्यात आलं. 

2/7

लामांचा शोध

14  th dalai lama real name and interesting facts india china clash

दलाई लामांना निवडलं जात नाही तर, त्यांना शोधलं जातं. किंबहुना तिबेटन संस्कृतीच्या मते दलाई लामा यांच्याकडे पुढच्या जन्मी त्यांना कोणत्या शरीरात जन्म घ्यायचा आहे ही निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. लामांच्या निधनानंतर पुढील दलाई लामा निवडण्याचे अधिकार इतर लामा आणि तिबेटच्या सरकारकडे असतात. 

3/7

शोध

14  th dalai lama real name and interesting facts india china clash

जिथं दिवंगत दलाई लामा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी धूर नेमका कोणत्या दिशेला जातोय याचा अंदाज घेतला जातो. त्याच अनुषंगानं नव्या दलाई लामांचा शोध सुरु होतो. यामध्ये अनेक धार्मिक मान्यतांचा समावेश आहे. सध्याचे दलाई लामा शोधण्यासाठी साधारण 4 वर्षांचा काळ लागला.   

4/7

भारत दौरा

14  th dalai lama real name and interesting facts india china clash

1956 मध्ये चीनचे तत्कालीन पंतप्रधान झाऊ एन-लाई भार दौऱ्यावर आले असता दलाई लामा त्यांच्यासोबत होते. तेव्हाच त्यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासमोर तिबेटच्या स्वातंत्र्याचा मुद्दा छे़डला होता. भारताच्या दौऱ्यानंतर काही वर्षांनी चीनच्या सरकारनं दलाई लामा यांना बिजिंगमध्ये बोलवलं. पण, सुरक्षा किंवा तत्सं सारंकाही मागे सोडण्याची अट त्यांच्यापुढे ठेवली. 1959 मध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचं लक्षात येताच त्यांनी सैनिकाच्या वेशात भारत गाठला. इथं पोहोचण्यासाठी त्यांना 14 वर्षांचा काळ लागला होता.   

5/7

भारतानं शरण दिली

14  th dalai lama real name and interesting facts india china clash

तवांगवाटे भारतात येणाऱ्या लामा यांना त्याच वर्षी भारतानं शरण दिली जेव्हा त्यांचं वय 23 वर्षे इतकं होतं. ज्यानंतर त्यांच्यामागोमाग जवळपास 80 हजार तिबेटन नागरिक भारतात आले. असं म्हणतात की 1962 मधील भारत- चीन संघर्षासाठी दलाई लामांवरूनही वादाची ठिणगी पडली होती.   

6/7

शत्रू

14  th dalai lama real name and interesting facts india china clash

स्वीडिश पत्रकार बेर्टिल लिंटर यांच्या 'चाइनीज वॉर विद इंडिया' या पुस्तकातून देण्यात आलेल्या माहितीनुसार युद्धाच्या आधी चीनची अवस्था अतिशय वाईट होती. जवळपास 3 ते 4 कोटी नागरिकांचा दुष्काळ आणि तत्सम परिस्थितीमुळं मृत्यू ओढावला होता. या साऱ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी माओ त्से तुंग यांना एका नव्या शत्रूची गरज भासली आणि त्यांची नजर दलाई लामांवर पडली.   

7/7

संघर्षाची ठिणगी

14  th dalai lama real name and interesting facts india china clash

दलाई लामा (Dalai Lama Dharamshala) हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे राहत होते. त्यांना शरण दिल्यामुळं चीनचा भारतावर राग होताच तो आणखी वाढला. भारतावरील सूड उगवण्यासाठीच मग चीननं अनेक शांततापूर्ण मार्ग झिडकारत भारतावर हल्ला केला असंही म्हटलं जातं.