Viral Photo : ४ महिन्यांचा Pregnant आहे 'हा' तरूण

पुरूषाला मातृत्वाची ओढ 

| Dec 29, 2020, 20:27 PM IST

मुंबई : तुम्ही कधी कुणी पुरूष प्रेग्नेंट असल्याचं ऐकलं आहे का? तुमचं उत्तर 'नाही' असंच असणार. मात्र आज आम्ही तुम्हाला अशीच एक धक्कादायक बातमी देणार आहोत. १८ वर्षांचा युवक प्रेग्नेंट असून तो आता ४ महिन्यांचा गरोदर असल्याचं समजतंय. या तरूणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाणून घेऊया या गरोदर तरूणाबद्दल 

1/6

हे अनोखी घटना ब्रिटेन (Britain) मधील बोस्टन (Boston) मध्ये घडली आहे. बोस्टनमध्ये राहणाऱ्या १८ वर्षीय मिके चनेल (Mickey Chanel) चार महिन्यांचा प्रेग्नेंट आहे.

2/6

डॉक्टरांच्या माहितीनुसार,'मिकेच्या शरीरात फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम (Female Reproductive System) उपस्थित आहे. ज्यामुळे तो प्रेग्नेंट राहिला आहे. 

3/6

मिकेच्या आईच्या माहितीनुसार, जेव्हा मिके त्यांच्या गर्भात होता तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की, त्यांना मुलगी होईल. मात्र मुलाने जन्म घेतला. मिकेला अगदी मुलाप्रमाणे सांभाळलं. मात्र आतून तो काही वेगळं अनुभवायचे. लहानपणापासूनच त्याला मुलींच्या गोष्टीत रस होता. 

4/6

मिकेने सांगितलं की,'तो लहानपणापासूनच मुलींच्या सामानासोबत खेळत असे. त्याला लिपस्टिक लावणं आणि पर्ससोबत खेळणं अतिशय आवडायचं.' पुढे मिके म्हणतो की, शाळेतही त्याला मुलं त्रास द्यायची. अनेकजण मला Gay असं संबोधायचे.

5/6

मिके चनेल (Mikey Chanel) ने म्हटलं की,'मला कायमच पालक होण्याची दाट इच्छा होती. आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे. मी खूप आनंदी आहे. मिकेने पुढे सांगितलं की, मी जागरुकता पसरवण्याच्या उद्देशाने या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत आहे.

6/6

मिके आपल्या होणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. मिके म्हणतो की,'मी एक एक करून दिवस मोजत आहे. मी लवकरात लवकर आपल्या बाळाला बघू इच्छितो.'