मिठी कोपली, मुंबई बुडाली; आजही '26 July' च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर येतो काटा

Flashback 26 July 2005 : दोन आठवड्यापासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रोज सकाळी वरुण राजा बरसतो. आजही तो नेहमीप्रमाणे आला खरा...त्या '26 July'च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर आजही काटा येतो. 

Jul 26, 2023, 08:56 AM IST

26 July Mumbai Floods : सकाळपासूनच दाटलेले ढग आणि बरसणारा पाऊस अशा वातावरणाने मुंबईकरांना आठवण झाली 'आज 26 जुलै आहे' याची! त्या दिवसाची आठवण आणि समोरील पावसाने अनेकांच्या डोळ्यासमोर ती बुडणारी आणि ठप्प झालेली मुंबईचं भयान चित्र डोळ्यासमोर आलं. 

1/12

तो दिवस, 18 वर्षांपूर्वी मुंबईसह उपनगरात ढगफुटीमुळे थैमान घातला होता.मिठी नदी कोपल्याने मुंबई बुडाली होती. तब्बल तीन दिवस मुंबई ठप्प झाली होती.  

2/12

महापुराचं संकट त्या दिवशी मुंबईकरांनीही अनुभव होतं. 25 जुलैच्या रात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार सरी कोसळत होत्या. 26 जुलैला पावसाने रौद्ररुप दाखवलं होतं. 

3/12

पाणी तुंबलं, रेल्वे बंद पडली, रस्ते वाहतूक ठप्प झाली, मुंबईकर जागोजागी अडकून पडले होते. 

4/12

 मुंबईतील इमारती, वस्त्यांमध्ये पाणी घुसून अनेकांचे संसार वाहून गेले होते. या महापुरात मुंबईकरांचं स्पिरीटही दिसून आलं. ओळखी नसतानाही ते एकमेकांचे आधार बनले होते. 

5/12

ऑफिसमधून घराची ओढ लागलेले मुंबईकर रेल्वे, बस, रस्त्यावर रात्रभर अडकली होती. अगदी दोन तीन दिवस पायपीट करुन काही मुंबईकरांनी घरं कसंबसं गाठवलं होतं.

6/12

बेस्टची डबलडेकर बसही या महापुरात पाण्याखाली गेली होती. नाल्याच्या वाहत्या पाण्यात प्रवाहाबरोबर अनेक जण वाहून गेले होते. अफवांमुळे कुठे चेंगराचेंगरी तर भूस्खलनामुळे अनेकांचे बळी गेले. त्या दिवशी 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

7/12

पहिल्यांदाच, मुंबईची विमानतळे मुसळधार पुरामुळे आणि अत्यंत खराब दृश्यमानतेमुळे 30 तासांपेक्षा जास्त काळ बंद ठेवण्यात आली होती. 700 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली किंवा उशीर झाला.

8/12

हजारो प्राण्यांचे शव पुराच्या पाण्यात तरंगत होते. पुरामुळे सांडपाणी तुंबली. सर्व जलवाहिन्या दूषित झाल्या होत्या. शासनाने सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये क्लोरीन टाकण्याचे आदेश दिले.

9/12

हजारोंनी आपली घरे गमावली, मृतांची संख्या शेकडोमध्ये होती, लाखोंनी त्या भयंकर संध्याकाळी घरी परतण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास केला. 500 कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचं नुकसान झालं होतं. 

10/12

निद्रीस्तावस्थेतील मिठी नदी कोपल्याने मुंबई बुडाल्याने मुंबईचा श्वास लोकल सेवा ठप्प झाली होती. तब्बल 10 ते 12 दिवस लागली मुंबई लोकल सेवा पूर्ववत होण्यासाठी. 

11/12

या महापुरात सवरत असताना मुंबईकरांसमोर दुसरं संकट उभं राहिलं ते रोगराईचं. त्यातून मुंबईकर लढून पुन्हा नवीन दिवसासाठी सज्ज झाले. 

12/12

मुंबईकर कधीच कोणत्या संकटाला घाबरला नाही. पण 26 जुलैच्या दिवस आठवला तर डोळ्यासमोर उभी राहते पाण्यात गेलेली मुंबई. आजही त्या दिवसाने मुंबईकराचं मन भयभीत होतं.