अवघ्या २६ व्या वर्षी या अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप, जगभरातून शोक व्यक्त

Jan 27, 2021, 16:03 PM IST
1/5

दक्षिण कोरियाची सुप्रसिद्ध अभिनेत्री सॉन्ग यू-जुंग (Song Yoo Jung)हिने अवघ्या 26 व्या वर्षात जगाचा निरोप घेतला. वृत्तानुसार 25 जानेवारी रोजी सॉन्ग यू-जुंग हिचे निधन झाले. मात्र, तिच्या मृत्यूमागील कारण समजू शकलेले नाही. सॉन्ग यू-जुंगच्या निधनाने संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

2/5

टीव्ही शो आणि म्यूझिक व्हिडिओच्या माध्यमातून तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. 2013 मध्ये तिने अभिनयाला सुरवात केली. एका मालिकेत तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि ती एका रात्रीत स्टार झाली. २०१४ मध्ये यू-जुंग मेक योर विश या मालिकेत दिसली.

3/5

आपल्या या छोट्या कारकीर्दीत, सॉन्ग यू-जुंगने मोठी फॅन फॉलिविंग तयार केली. 2018 मध्ये, सॉन्ग आयकॉन्स म्युझिक बँडमध्ये ती दिसली होती. 2019 मध्ये सॉन्ग वेब मालिका डियर माय नेममध्ये दिसली. तिने तिच्या जोडीदाराच्या शोधात असलेल्या हायस्कूलच्या विद्यार्थिनीची भूमिका साकारली.

4/5

2020 मध्ये ती म्युझिक व्हिडिओ नाईव्हज हाऊ डू आय मध्ये ती लीडमध्ये दिसली. अभिनयाशिवाय तिने टीव्ही कमर्शियलमध्येही काम केले होते. सॉन्ग सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव होती. इन्स्टाग्रामवर ती नेहमी फोटो पोस्ट करायची. तिने कॉस्मेटिक उत्पादनांची जाहिरात देखील केली.

5/5

चाहत्यांनी सॉन्गला श्रद्धांजली वाहताना अनेक भावनिक पोस्ट लिहिल्या आहेत. ग्लोबल न्यूज वेबसाईटनुसार दक्षिण कोरियात कलाकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. दक्षित कोरियात आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.