IND vs ENG: टीम इंडियाच्या पराभवामागील 7 कारणं

पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने शानदार कामगिरी करत यजमान भारताला 227 धावांनी पराभूत केले.  

Feb 09, 2021, 15:39 PM IST

चेन्नई टेस्ट सामन्याच भारतील संघाला प्रबळ दावेदार समजलं जात होतं. मात्र इंग्लंडने भारतीय संघाचा पराभव करत विजय आपल्या नावावर केला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.चेन्नईच्या मैदानावर भारतीय संघ जिंकू शकत होता. पण महत्त्वाच्या 7 कारणांमुळे भारतील संघाला त्यांच्याचं घरात हार मानावी लागली. 

 

1/7

पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे भरताला टॉस हारणं महागात पडलं. त्यामुळे संपूर्ण सामन्यावर इंग्लंडला वर्चस्व गाजवता आलं.   

2/7

पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. जो रूट आणि डोमिनिक सिबली यांच्यात झालेल्या 200 रन्सच्या भागिदारीत सामन्याला नवी कलाटणी मिळाली. तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची योजना काही ठिकाणी कमी पडली.   

3/7

पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांची कामगिरी फारशी समाधान कारक ठरली नाही. ज्याचा फायदा इंग्लंड गोलंदाजांनी पूरेपुर घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात 20 बॉल तर दुसऱ्या डावात 7 नो बॉल दिले. भारतीय स्पिनर शाहबाज नदीमने पहिल्या डावात सर्वात जास्त नो बॉल दिले.   

4/7

भारतीय संघाची चौथी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे चेन्नई कसोटीत विराट कोहलीने प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवची निवड न करता मोठी चूक केली.  

5/7

पहिल्या डावात विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांचं मैदाना बाहेर पडणं संघासाठी सर्वात धक्कादायक ठरलं.   

6/7

विराट कोहलीच्या चेन्नई कसोटीत डीआरएस घेण्याच्या निर्णयाने बरेच प्रश्न उपस्थित केले होते. या निर्णयामुळे विराट सध्या ट्रोल होत आहे.   

7/7

महत्त्वाचं म्हणजे तब्बल 36 वर्षांनंतर इंग्लंडने भारतीय संघाला चेन्नईच्या मैदानावर हरवलं आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 1985 साली इंग्लंडला अखेरच्या वेळी भारताविरुद्ध विजय मिळविण्यात यश आले.