तब्बल 101 किलो चांदीचा 90 लाखांचा चंदेरी गणपती; जालनातील अनोखी मंडळाचा बाप्पा

जालना येथील चांदीचा गणपती सर्वांचे लक्ष वेधून आहे. हा गणपती  101 किलो वजनाचा आहे. 

Sep 19, 2023, 22:57 PM IST

Jalna Silver Ganesh Idol Worth 90 Lakhs  :  जालन्यात तब्बल 101 किलो चांदीचा 90 लाखांचा गणपती विराजमान झाला आहे. या सिलव्हर बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होवू लागली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्व साजरा करण्याच्या उद्देशाने या चांदीच्या बाप्पाची स्थापना करण्यात आले. 

1/7

 सर्वत्र वाजत गाजत अगदी धुम धडाक्यात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे.  जालना येथील चांदीचा गणपती सर्वांचे लक्ष वेधून आहे.  

2/7

हा गणपती बनवायला सहा महिने लागली असून तब्बल 101 किलो चांदी वापरण्यात आली असून याची किंमत तब्बल 90 लाख रुपये आहे.

3/7

यंदा चांदीचा बाप्पा बसवण्याची संकल्पना नगरसेवक भारतीया यांना सूचली आणि त्यांनी मागच्या 11 महिन्यांपूर्वी खामगाव येथील रजत नगरीत चांदीच्या गणरायाची ऑर्डर दिली.  

4/7

नगसेवक जगदीश भरतीया यांच्या पुढाकारातून या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी मंडळाकडून वेगवेगळे समाजिक उपक्रम राबवले जातात.  

5/7

 अनोखा गणेश मंडळाकडून यंदा गणरायाच्या चांदीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलीये.. अनोखा गणेश मंडळाचं यंदाचं हे 9 वं वर्ष आहे.

6/7

जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात हा बाप्पा विराजमान झाला आहे.  

7/7

तब्बल 101 किलो वजनाचा हा चांदीचा गणपती आहे. याची किंमत 90 लाख इतकी आहे. हा चंदेरी बाप्पा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.