भारतातील 'या' शिव मंदिराचं रक्षण करतो बेडूक; काय आहे यामागील रहस्य?

भारत हा मंदिरांचा देश असून आपल्या देशात लाखो मंदिरं आहेत. यापैकी अनेक मंदिरे आहेत जी रहस्यमय आहेत आणि भक्तांना तेथे चमत्कारही पाहायला मिळतात. 

| Jul 23, 2024, 20:09 PM IST
1/7

आजपर्यंत तुम्ही अनेक शिवमंदिरांमध्ये गेले असाल. यावेळी तुम्हाला भोलेनाथाचे वाहन नंदी नक्कीच सापडेल. परंतु एक असं भगवान शिवाचं मंदिर आहे, ज्याचं रक्षण बेडूक करतोय. 

2/7

शिवाचं हे बेडूक मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. हे मंदिर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील ओयल शहरात आहे. हे मंदिर भगवान शिवाचे मंदिर आहे.

3/7

या शिवमंदिराचं रक्षण बेडूक करत असल्यामुळे त्याला बेडूक मंदिर असंही म्हणतात. हे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे. 

4/7

11 व्या शतकापासून या मंदिराच्या देखभालीची जबाबदारी चाहमना शासकांवर होती. यावेळी मंडूक यंत्राच्या आधारे हे मंदिर बांधण्यात आलं आहे. जो चाहमना घराण्यातील राजा बख्श सिंहने बांधला होता. 

5/7

पौराणिक मान्यतेनुसार, या मंदिरात भगवान शिव एका पावसाळी बेडकाच्या पाठीवर बसलेले असून बेडूक त्याचं रक्षण करताना दिसतोय. भारतातील हे एकमेव मंदिर आहे जिथे बेडूक शिवाचं रक्षण करतो. 

6/7

असं मानलं जातं की, या मंदिरात जो कोणी भक्त खऱ्या मनाने प्रार्थना करतो, भगवान शिव त्याच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात.   

7/7

असंही म्हटलं जातं की, हे मंदिर तंत्रशास्त्रानुसार बांधलं गेलं होतं, म्हणून त्याचं छत्र देखील त्यावर आधारित होतं.