ज्या नदीचे कधी लग्नच झाले नाही, तिच नदी विरुद्ध दिशेला वाहते

भारतातील नद्यांना देवी आणि माता मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. गंगा नदी ही सर्वात पवित्र नदी मानली जाते म्हणून तिला गंगा देवी म्हणतात.

Jul 14, 2024, 16:43 PM IST

भारतातील नद्यांना देवी आणि माता मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. गंगा नदी ही सर्वात पवित्र नदी मानली जाते म्हणून तिला गंगा देवी म्हणतात.

1/7

देशातील बहुतेक नद्यांचे वर्गीकरण स्त्री रूपात करण्यात आले आहे. फक्त ब्रह्मपुत्रा नदी जी पुरुष मानली जाते. भारतात सुमारे 400 नद्या आहेत. पण उलट दिशेने वाहणारी एकच नदी आहे ती म्हणजे नर्मदा.  

2/7

बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागरात संपतात. आणि नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्राला मिळते.

3/7

कथेनुसार नर्मदा कुमारी का आहे? नर्मदा आणि सोनभद्र यांचे सुंदर मिलन होणार होते पण लग्नापूर्वी नर्मदाला कळले की सोनभद्रला तिची दासी जुहिला आवडते. या दोन्ही जोडप्याच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाले. प्रेमात धोका मिळाल्यानंतर नर्मदा सोनभद्रपासून लांब निघून गेली. 

4/7

नर्मदाने तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराच्या अगदी उलट जाऊन पश्चिम दिशेने तिचा प्रवाह बदलण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर नर्मदा नदीने आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं नर्मदा नदी उलट्या दिशेने वाहते.  

5/7

शास्त्रज्ञांचे मते, रिफ्ट व्हॅली हे नर्मदा नदीच्या उलट्या  प्रवाहाचे कारण आहे. म्हणजे नदीचा उतार हा तिच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे. त्यामुळे त्या दिशेने नदी वाहते. 

6/7

नर्मदा नदी ही मध्यप्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील अमरकंटक पठारावरून उगम पावते. नर्मदा नदीचे खोरे अंदाजे 98,796 चौरस किलोमीटरचे क्षेत्र आहे आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पसरलेले आहे. ताप्ती, माही, साबरमती, लुनी आणि अनेक लहान नद्याही पश्चिमेकडे वाहतात. पण नर्मदा ही एकमेव मोठी नदी आहे जी अरबी समुद्रात येते. 

7/7

देशातील ही सर्वात मोठी पाचवी नदी आहे.  या नदीला काही ठिकाणी रेवा नदी असेही म्हणतात. शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांमध्ये समाविष्ट असलेले ओंकारेश्वर मंदिरही नर्मदा नदीच्या काठावर बांधले आहे.