तारुण्यातच वयोवृद्धांची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवणारे कलाकार; तुम्हाला कोणाची भूमिका सर्वाधिक भावली?

Bollywood Facts : थोडक्यात आपल्या प्रत्यक्ष वयाहून जास्त वयाच्या भूमिका स्वीकारत आणि ताकदीनं साकारत या कलाकारांनी प्रेक्षकाच्या मनावर कायमस्वरुपी भुरळ पाडली आहे. 

Mar 07, 2024, 15:01 PM IST

Bollywood Facts : कलाकाराला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. हिंगी कलाजगतामध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून हेच सिद्ध केलं आहे. 

1/8

अनुपम खेर

Actors Played Roles That Were beyond their Real Age know the list

'सारांश' या चित्रपटामध्ये अनुपम खेर यांनी साकारलेली वयोवृद्ध वडिलांची भूमिका कोणीही विसरु शकलेलं नाही. यावेळी त्यांचं वय 20 वर्षांहून काहीसंच जास्त होतं. 

2/8

अमिताभ बच्चन

Actors Played Roles That Were beyond their Real Age know the list

बिग बी अमिताभ बच्चन यांनी 66 व्या वर्षी एका 12 वर्षाच्या मुलाची भूमिका साकारली होती. वयाच्या आकड्याच्या तुलनेत त्यांनी साकारलेली ही भूमिका विशेष गाजली होती. 

3/8

मनोज बाजपेयी

Actors Played Roles That Were beyond their Real Age know the list

'अलिगढ' या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयीनं त्याच्या वयाहून साधारण 15 ते 20 वर्षे जास्तीची भूमिका साकारली होती. या भूमिकेला कमालीची समीक्षक पसंती मिळाली होती.   

4/8

ऋषी कपूर

Actors Played Roles That Were beyond their Real Age know the list

अभिनेते ऋषी कपूर यांनी 'कपूर अँड सन्स' चित्रपटामध्ये एका आजोबांची व्यक्तीरेखा साकारली होती. त्यावेळी त्यांचं खरं वय होतं 63 वर्षे. 

5/8

रिचा चड्ढा

Actors Played Roles That Were beyond their Real Age know the list

अभिनेत्री रिचा चड्ढानं 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटामध्ये साकारलेली नगमा खातून तिच्या वयाच्या पल्ल्याड होती. रिचानं ही भूमिका अवघ्या 26 व्या वर्षी साकारली होती.   

6/8

नर्गिस

Actors Played Roles That Were beyond their Real Age know the list

अभिनेत्री नर्गिस यांनी 'मदर इंडिया' चित्रपटामध्ये तारुण्यावस्थेसोबतच वयोवृद्ध भूमिकाही साकारली होती. यावेळी त्यांचं वय होतं 28 वर्षे.   

7/8

राखी

Actors Played Roles That Were beyond their Real Age know the list

अभिनेत्री राखी यांनी 'शक्ती' चित्रपटात साकारलेली भूमिका आठवतेय? ही भूमिका साकारली तेव्हा राखी यांचं वय होतं 35 वर्षे. 

8/8

रोहिणी हट्टंगडी

Actors Played Roles That Were beyond their Real Age know the list

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी 'अग्निपथ' चित्रपटामध्ये साकारलेली बिग बींच्या आईची भूमिका त्यांच्या वयाहून कैक वर्षे मोठी होती. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी 'कस्तुरबा' ही भूमिका साकारली तेव्हाही त्यांचं वय अवघी 27 वर्षे इतकंच होतं.