बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट नाही, तरीही 1000 कोटींचा चित्रपटाचा विक्रम 'या' अभिनेत्रीच्या नावावर

साउथ अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट दिला नाही पण तिचा एक चित्रपट आहे ज्याने 1000 कोटींची कमाई केली आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

| Aug 29, 2024, 16:42 PM IST
1/7

साउथ अभिनेत्री

साउथमधील अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला करून आपले खास स्थान निर्माण केलं आहे. या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. 

2/7

तमन्ना भाटिया

या अभिनेत्रीला इंडस्ट्रीमध्ये 19 वर्षे झाली आहेत. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून तमन्ना भाटिया आहे. तमन्नाने बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट दिलेला नाही तरीही ती प्रसिद्ध आहे. 

3/7

'स्त्री 2'

तमन्ना भाटिया नुकतीच 'स्त्री 2' चित्रपटात दिसली होती. तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. 'स्त्री 2' चित्रपटामधील तिचा डान्स सर्वत्र व्हायरल होत आहे. चाहते तिचं कौतुक देखील करत आहेत. 

4/7

अभिनय क्षेत्रात पदार्पण

अभिनेत्रीने 16 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आतापर्यंत तिने 85 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी काही ब्लॉकबस्टर ठरले आहेत. 

5/7

1000 कोटींची कमाई

तमन्ना भाटियाने 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली 2: द कन्क्लूजन'मध्ये काम केलं आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई केली होती. 

6/7

बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनेत्रीने 'चाँद सा रोशन चेहरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. 

7/7

एकूण संपत्ती

अभिनेत्री तमन्ना भाटियाची एकूण संपत्ती ही 120 कोटी रुपये आहे. सध्या ती एका चित्रपाटासाठी 1 ते 3 कोटी रुपये घेते.