रोनाल्डोनंतर lionel Messi ही जॉईन करणार एशिया क्लब? मिळतेय 30 अब्जांची ऑफर

अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू आणि बार्सिलोनाचा माजी खेळाडू लिओनेल मेस्सी सध्या पीएसजी क्बलकडून खेळतोय. तो यापूर्वी कधीच एशियन क्लबकडून खेळला नाहीये.

Jan 19, 2023, 16:25 PM IST
1/5

नुकतंच ख्रस्तियानो रोनाल्डो अल-नासर या क्लबशी करारबद्ध झाला आहे. त्यानंतर आता एशियाचे इतर क्लब लिओनेल मेस्सीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत 

2/5

मिडीयो रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, अल हिलाल आणि अल इतिहाद हे क्लब मेस्सीला साऊदी अरबमध्ये आणू इच्छितात. यासाठी ते 350 दशलक्ष युरो म्हणजेच 30 अब्ज रुपयांपर्यंतच्या करार करण्यासही तयार आहेत.

3/5

हे दोन्ही क्लब ऑफर देण्यासाठी तयार आहे. मुख्य म्हणजे ते, सरकारकडे मदत मागत आहेत जेणेकरून ते मेस्सीला अधिकृतपणे ऑफर देऊ शकतील.

4/5

अल हिलालने यापूर्वी रोनाल्डोला देखील ऑफऱ दिली होती. मात्र याचवेळी अल-नासरने बाजी मारली. 

5/5

रोनाल्डोने आतापर्यंत अल-नासरसाठी एकही सामना खेळलेला नाही. तो त्याचा पहिला सामना मेस्सीविरुद्धच खेळणार आहे.