शिखर धवननंतर आता 'हे' क्रिकेटर्स निवृत्तीच्या वाटेवर, 'या' मराठमोळ्या खेळाडूचाही समावेश

भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवन याने 24 ऑगस्ट रोजी अचानकपणे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धवनला मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. शिखर धवननंतर आता टीम इंडियामधून बराचकाळ संधी न मिळालेले काही खेळाडू सुद्धा निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात. 

Aug 26, 2024, 14:06 PM IST
1/5

ईशांत शर्मा :

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. ईशांतने 2021 मध्ये टीम इंडियाकडून शेवटचा टेस्ट सामना खेळला होता.  त्यानंतर त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. ईशांत शर्मा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो.  

2/5

अजिंक्य रहाणे :

मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणे हा सध्या 36 वर्षांचा असून याला सुद्धा मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. जून 2023 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये अजिंक्यला टीम इंडियाकडून खेळण्याची शेवटची संधी मिळाली होती. सध्या अजिंक्य चेन्नई सुपरकिंग्सकडून आयपीएलमध्ये खेळतो. मात्र आयपीएल 2024 मध्ये त्याचा परफॉर्मन्स काही खास नव्हता. तेव्हा मीडिया रिपोर्ट्सनुसार शिखरनंतर आता अजिंक्य रहाणे सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो.   

3/5

ऋध्दिमान साहा :

ऋध्दिमान साहा हा विकेटकिपर फलंदाज असून त्याने टीम इंडियाकडून शेवटचा सामना 2021 रोजी न्यूझीलंडकडून खेळला. ऋध्दिमान आता 39 वर्षांचा झाला असून तो अजूनही आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना दिसतो. ऋध्दिमान याने टीम इंडियाकडून 40 टेस्ट आणि 9 वनडे सामने खेळले आहेत. 

4/5

पियुष चावला :

पियूष चावला हा भारताचा स्टार फिरकीपटू असून तो 2011 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. त्यानंतर 2012 मध्ये त्याने अखेरचा सामना खेळला. मात्र त्यानंतर पियुष चावला याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. पियूष आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसतो. पियुषचे वय आता 35 आहे, तेव्हा सूत्रांच्या माहितीनुसार पियुष चावला सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. 

5/5

अमित मिश्रा :

 भारताचा दिग्गज गोलंदाज अमित मिश्रा याने टीम इंडियाकडून शेवटचा सामना 2017 रोजी खेळाला होता. 41 वर्षीय गोलंदाज सध्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळताना दिसतो. अमित मिश्रा याने अद्याप अधिकृतपणे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली नाही तरी समोर येत असलेल्या चर्चांनुसार तो आयपीएल 2025 नंतर क्रिकेटला राम राम ठोकू शकतो.